सोमवारी अहमदनगरमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली (फोटो सौजन्य - pinterest)
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली शांतता रॅली सोमवारी 12 ऑगस्ट रोजी अहमदनगरमध्ये धडकणार आहे. राज्यात मराठा आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. तसेच मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. मनोज जरांगेनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमच्या आदल्या दिवशी अहमदनगरमध्ये शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे या रॅलीला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने अहमदनगरमधील सर्व शाळांना 12 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
हेदेखील वाचा- मावळ लोकसभा निवडणूक निकालाला आव्हान देणारी याचिका फेटाळली; बारणेंसह पराभूत उमेदवारांच्या विरोधात सुधारित याचिका दाखल
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण, सगेसोयरे अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करावी आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली सुरु केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून जरांगेंनी शांतता रॅलीला सुरुवात केली आहे. या रॅलीमध्ये लाखो मराठा बांधव सहभागी होत आहेत. या रॅलीच्या माध्यमातून मराठा समाजाचे भव्य शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ही रॅली सोमवारी 12 ऑगस्ट रोजी अहमदनगरमध्ये दाखल होणार आहे. या रॅलीला मराठा बांधवांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभमीवर जिल्हा प्रशासनाने अहमदनगरमधील सर्व शाळांना 12 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याबाबत एक पत्रक देखील प्रसिध्द करण्यात आलं आहे.
पत्रकात म्हटलं आहे की, सोमवारी 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षण जनजागृती व महाविराट शांतता रॅलीचं आयोजन केलं आहे. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकत्रित होणार आहे. सदर गर्दीचा विचार करून शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अहमदनगर शहर व उपनगरातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यनस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना सोमवार 12 ऑगस्ट रोजी सुट्टी देण्यात येणार असून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सदर तासिका इतर दिवशी भरून काढाव्यात.
हेदेखील वाचा- नंदीग्राम एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात एकाची गळफास घेऊन आत्महत्या; दादर रेल्वे स्टेशनवरील घटना
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण, सगेसोयरे अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करावी आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली सुरु केली आहे. 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रातून मनोज जरांगेंच्या रॅलीला सुरुवात झाली आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूरमध्ये मनोज जरांगेंच्या रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. या रॅलीत मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आहेत. या रॅलीदरम्यान जरांगेनी मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजाणी करण्यासाठी जरांगेंनी सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. 13 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर विधानसभेत उतरत सर्व जागा लढण्याचा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे. त्यामुळे आता आरक्षण दिलं नाही तर जरांगे कोणते उमेदवार विधानसभेच्या मैदानात उतरवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.