कणकवली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागोजागो प्रचार सुरु आहे. त्याचबरोबर शासन मतदान करण्याचे आवाहन करत आहे. याचदरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७ मे २०२४ रोजी जनतेने निर्भयपणे मतदान करावे, या उद्देशाने कणकवली पोलिसांनी कणकवली शहर, फोंडा बाजारपेठ या ठिकाणी पोलीस संचलन करण्यात आले. यामध्ये ५ पोलीस अधिकारी, ६० पोलीस अंमलदार, सीमा सुरक्षा बल, होमगार्ड यांचा समावेश होता.
यावेळी कणकवली सहाय्यक पोलीस मनोज पाटील ,पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ,सागर शिंदे आदींनी संचालनामध्ये सहभाग घेतला. आज सकाळी कणकवली पोलीस ठाणे हद्दीत कणकवली बाजारपेठमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, एस. टी.स्टँड, आप्पासाहेब पटवर्धन चौक, तसेच फोंडाघाट बाजारपेठ या ठिकाणी संचलन करण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून काळजी घेण्यात येत आहे.