Satara Lok Sabha Constituency : लोकसभेचे बिगूल वाजल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडी असो की महायुती यांच्यातील जागांचा तिढा अजून तसाच आहे. सातारा लोकसभा हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही तो मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे आहे. महाविकास आघाडीचा 48 जागा वाटपाचा निर्णय झालेला आहे ज्या पक्षाकडे ती जागा आहे त्या पक्षाने आपला उमेदवार ठरवायचा आहे.
चर्चा कोणी करायची हा त्यांचा प्रश्न आहे 48 जागांवर जवळजवळ एकमत झालेले आहे काही ठिकाणी चर्चा सुरू आहे. सातारा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असावा याबाबत चर्चा चालू असून काल जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली मी माझे मत त्यांना सांगितले.
हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांना घ्यायचाय माझी एवढीच विनंती आहे की आपण चांगला सक्षम उमेदवार द्यावा जेणेकरून भाजपचा उमेदवार निवडून येणार नाही.
तुम्ही जो उमेदवार द्याल त्याच्या पाठीशी काँग्रेस सह आघाडीतील सर्व पक्ष पाठीशी असतील जयंत पाटील आणि माझ्या भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे त्यात काही अर्थ नाही साताराबाबत शरद पवार व जयंत पाटील यांना विचारा.
हा तुतारीचा विषय
हा तुतारीचा विषय आहे तुतारीचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे सातारा लोकसभेबाबत पर्याय सापडत नाही तर काँग्रेसने सातारा लोकसभा लढवावी असा काही प्रस्ताव अजून आलेला नाही.
ताकदीने लढले पाहिजे
मला या ठिकाणी जातीयवादी प्रतिनिधी नको राष्ट्रवादी जो निर्णय घेईल त्याच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभे आहोत. राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आला तर विचार करू माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की ताकतीने लढले पाहिजे.