गडचिरोली : रासायनिक खताचा वापर कमी करुन जैविक खताचे महत्व शेतक-यांपर्यंत पोहोचवा व जैविक किडनाशके आणि खते वापरून सेंद्रीय शेतीला चालना द्या, असे आवाहन केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister for Roads, Transport and Highways Nitin Gadkari) यांनी केले. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था नागपूर (Central Citrus Fruit Research Institute Nagpur) येथे २६ जून रोजी राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन (Organizing national workshops )करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या कार्यशाळेला भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली (Indian Council of Agricultural Research New Delhi) येथील महासंचालक डॉ. त्रिलोकन मोहपात्रा, (Director General Dr. Trilokan Mohapatra) नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाचे उपमहासंचालक डॉ. सुरेशकुमार चौधरी,(Dr. Sureshkumar Chaudhary), कृषी वैज्ञानिक भरती निवड मंडळ नवी दिल्ली येथील माजी अध्यक्ष तथा डॉ. पंदेकृवि अकोलाचे कार्यकारी परिषद सदस्य डॉ. सी. डी. मायी, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था नागपूर येथील संचालक डॉ. दिलीप घोष, डॉ. पंदेकृवि अकोलाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. आर. एम. गाडे, संशोधक संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आशुतोष मुरकुटे, कृषी विज्ञान केंद्र सोनापूर – गडचिरोली येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख संदीप क-हाळे, विषय विशेषज्ञ पुष्पक बोथीकर उपस्थित होते.यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्र सोनापूर-गडचिरोलीला जैविक किडनाशके प्रयोगशाळेची उपकरणे प्रदान करण्यात आली.
शेतक-यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा
सदर जैविक कीडनाशके प्रयोगशाळेमध्ये ट्रायकोडर्मा, रायझोबियम यासारखे जैविक बुरशीनाके किडनाशके तयार करण्यात येणार आहेत. याद्वारे रासायनिक खतांचा वापर कमी होवून उत्पादन वाढीकरीता पोषक ठरणार आहे. शेतक-यांच्या रासायनिक खतांवर होणारा अति खर्चात बचत होवून जमिनीची पोत सुधारण्यास व रोगाचे व्यवस्थापन होण्यास मदत होईल. शेतक-यांना वेळेत व कमी खर्चात बुरशीनाशके उपलब्ध होतील व त्यातून जमिनीचे, मानवी आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. सदर जैविक बुरशीनाके शेतक-यांना खरेदी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर – गडचिरोली येथे उपलब्ध असून त्यासाठी शेतक-यांनी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभाग गडचिरोली यांनी केले आहे.