पुणे : ‘पुणे तेथे काय उणे’ असं नेहमीच पुण्याबद्दल बोलण्यात येतं. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या या शहराने आता आपली नवी ओळख निर्माण केली आहे. पुणे शहर देशातील सर्वात हरित शहर ठरलं आहे. तर राज्यातील दुसरं हरित शहर (Green City) ठरलं आहे. प्रतिष्ठित इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) च्या ग्रीन सिटी इंडेक्समध्ये प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे पुणे हे महाराष्ट्रातील पहिलं शहर ठरले आहे.
[read_also content=”खारघर दुर्घटनेनंतर सरकारला आली जाग! नवी मुंबईत स्वयंचलित हवामान केंद्र बसवले जाणार https://www.navarashtra.com/maharashtra/an-automatic-weather-station-will-be-installed-in-navi-mumbai-after-kharghar-incident-nrps-390438.html”]
IGBC ने पुणे महानगरपालिकेने हवेची गुणवत्ता सुधारणे, शहरी हरित कव्हर सिटी सॉईल कंझर्वेशन, जलाशयांचे जतन, पाण्याची कार्यक्षमता, पर्यावरणशास्त्र आणि त्याचे जतन यासह इतर विविध उपक्रमांचा अभ्यास करुन हे प्रमाणपत्र दिले आहे. याबाबत शहर नियोजन तज्ज्ञ अनघा परांजपे-पुरोहित यांनी सांगितले की, ‘‘ग्रीन सिटी इंडेक्समध्ये प्लॅटिनम, गोल्ड आणि सिल्व्हर अशा तीन प्रकारात रेटिंग दिले जातात. त्यात पुण्याला प्रथमच प्लॅटिनम रेटिंग मिळाला आहे तर ही देशातील दुसरी ‘ग्रीन सिटी’ म्हणून प्रमाणित केली आहे. त्या आधी राजकोट शहराला हा मान मिळाला आहे.
ग्रीन सिटी इंडेक्समध्ये शहरांच्या आठ ते नऊ श्रेणींमधील सुमारे ३० घटकांचे मोजमाप केले जाते. यामध्ये ऊर्जा, कार्बन डायऑक्साईड, जमिनीचा वापर, वाहतूक, पाणी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, हवेची गुणवत्ता, पर्यावरणीय प्रशासन आदींचा समावेश असतो. या श्रेणीतील विविध घटकांच्या आधारे शहराला गुण देत त्यांचा ग्रीन सिटी इंडेक्स ठरविला जातो. पर्यावरणाच्या अनुषंगाने शहराची कार्यप्रणाली, रचना आदींसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे