Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supriya Sule on Pune Crime: ‘पुणे महाराष्ट्राची ‘क्राईम कॅपिटल’ होतेय’; सुप्रिया सुळेंचा गृहविभागावर हल्ला

शिक्षण क्षेत्रात केंद्र असो वा महाराष्ट्र सरकार असो, मला आश्चर्य वाटते की, एवढं तंत्रज्ञान असताना पेपर फुटतातच कसे, मग पुर्वी जे होतं तेच चांगलं होतं ना, तेव्हा पेपर फुटत नव्हते. यात नुसत्या तंत्रज्ञानाची चूक नाहीये पण आता त्यातही करप्शन आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 30, 2026 | 04:35 PM
Supriya Sule

Supriya Sule

Follow Us
Follow Us:
  • विषारी दारू दुर्घटनेवरून खासदार सुप्रिया सुळेंचा गृहविभागावर टिका
  • दारू प्रकरणात निलंबन नको, पोलीस आयुक्तांची चौकशी करा
  • काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सगळी काँग्रेस तुम्ही घेणार असं होतं का
Supriya Sule on Pune Crime: “विषारी दारूमुळे पुण्यात जो प्रकार घडला तो अत्यंत दुर्देवी होता. केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाचा एक डेटा आहे. या डेटानुसार, महाराष्ट्रात गुन्हेगारीत पुणे पहिल्या क्रमांकावर आणि देशात पाचव्या क्रमांकावर आहे. पुणे शहर शिक्षण व्यवस्थेसाठी ओळखले जाते. या ठिकाणी देशभरातून परदेशातूल मुलं शिक्षणासाठी येत असतात. असे पुणे जर महाराष्ट्राचे क्राईम कॅपिटल होत असेल तर काय ओळख राहिली या शहराची. याला पूर्णपणे पुणे शहरातील पोलिस जबाबदार आहेत.” अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ” विषारी दारु प्रकरणात मी मुख्यमंत्र्याचे विधान ऐकले, पण पोलिस यंत्रणा असोत वा एक्साईज विभाग दोन्ही खात्यांची चौकशी झाली पाहिजे. असंही सुप्रिया सुळेंनी सांगितले. दारु प्रकरणात फक्त अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने काय होणार आहे. पुण्याची पोलीस आणि महाराष्ट्राचे सरकार काय करत आहे, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे.

माझी विनंती आहे की, तुम्ही डेटा पाहा केंद्राचा डेटा आहे. गुन्हेगारीत पुणे राज्यात पहिल्या आणि देशात पाचव्या क्रमांकांवर आहे, इथल्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे. पण पुण्यात गृहमंत्रालय सपशेल अपयशी झाले आहे. त्यामुळे इथल्या पोलिल आयुक्तांनी याची जबाबदारी घेतलीच पाहिजे. असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

Bhosari News: ‘भोसरी उड्डाणपूल पाडू नका, गावठाणात भूसंपादन नको!’ भूसंपादनावरून रवि लांडगे आक्रमक

राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला, यावरही त्यांनी प्रतिक्रीया दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की,”प्रत्येकाच्या काही अडचणी असतात. पण सगळ्याच गोष्टी कॅमेऱ्यावर बोलायच्या नसतात पण मी त्यावर काही बोलणार नाही. माझ्या प्राजक्त तनपुरेंना शुभेच्छा आहेत.

पण एक निरीक्षण मी मनमोकळेपणाने सांगु इच्छिते की, भाजपचे सगळे नेते काँग्रेसमुक्त भारत म्हणत होते. पण अहिल्यानगर जिल्ह्याकडे पाहिले असता एक राम शिंदे सोडले तर १०० टक्के ओरिजीनल नेतृत्त्व हे काँग्रेसचे आहे. लोकांना बदल हवा होता, पण काय बदललं, जी १०० कुटुंबे काल काँग्रेसमध्ये होती. ती भाजपमध्ये गेली. बदल काय झाला, असा खोचक सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझा भाजपला प्रश्न आहे की काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सगळी काँग्रेस तुम्ही घेणार असं होतं का, पणतुम्ही सगळी काँग्रेस बाजुला करून आपल्या विचारधारेच्या कार्यकर्त्यांला भाजपमध्ये संधी देणार, आम्हाला वाटलं होतं. तुमचे सगळे कार्यकर्ते, निष्ठावंत नेते कुठे गेले, असाही सवाल त्यांनी उपस्थित ेला. तेही सोडा आमचे प्रकाशजी जावडेकर कुठे गेले, असाही टोला यावेळी सुप्रिया सुळे यांनी लगावला.

मला या देशात टॅलेंटची कमतरता नाही, ते गेले त्यांना शुभेच्छा आहेत. सत्तेत असताना ते आमच्यासोबत होते. आज विरोधात आहोत. संघर्ष करू आणि नवीन टॅलेंटसह शुन्यातून नवे विश्व उभे करू. असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

विविध मागण्यांसाठी RTO कर्मचारी जाणार बेमुदत संपावर; आधी 2 जूनला निदर्शने करणार अन् नंतर

शिक्षण क्षेत्रात केंद्र असो वा महाराष्ट्र सरकार असो, मला आश्चर्य वाटते की, एवढं तंत्रज्ञान असताना पेपर फुटतातच कसे, मग पुर्वी जे होतं तेच चांगलं होतं ना, तेव्हा पेपर फुटत नव्हते. यात नुसत्या तंत्रज्ञानाची चूक नाहीये पण आता त्यातही करप्शन आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या शिक्षण खात्याला त्याची नैतिक जबाबदारी घ्यावी लागेल. या मुलांच्या करियरचा प्रश्न आहे.

काँग्रेसमुक्त भारत नारा देत होते. पण ज्यांच्यावर आरोप झाले, केसेस टाकल्या गेल्या, ते सगळे भाजपमध्ये आहेत. गेल्या वर्षभरातील माझे भाषण काढा, किंवा राहुल गांधी, अखिलेश यादव यां सर्वांची भाषणे काढा, ममता दिदिंपासून आमच्या पर्यंत वारंवार होणाऱ्या महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराबाबत आम्ही सातत्याने बोलत आलो आहोत. आम्ही जेजे म्हटलो आहोत. त्या सगळ्या गोष्टी तुमच्याही डोळ्यासमोर घडल्या आहेत.

 

 

 

Web Title: Pune becoming maharashtras crime capital mp supriya sule slams home ministry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • Pune Police
  • supriya sule

संबंधित बातम्या

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
1

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
2

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
3

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.