नाशिकमध्ये महायुतीचा तिढा वाढला! उमेदवारीवरून शिंदे गट-अजित पवार गटात नाराजी, अपक्ष उमेदवारीने रंगले समीकरण
भाजपाचे मतदारसंघात वर्चस्व असल्यानेही जागा न सुटल्याने नाराजी जाणवली, मात्र शिंदे गटाची उमेदवारी दाखल करतांना भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावत सर्व काही आलबेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी महाविकास आघाडीतील एकवाक्यतेचा अभाव दिसून आला. नाशिकची जागा ठाकरे गट लढविणार असे सांगितले जात असतांना अखेरच्या दिवशीही कोणीही उमेदवार पुढे न आल्याची नामुष्की ओढवली आहे.
Satara Politics : शपथपत्रातील माहितीवरून दोन नगरसेवक अडचणीत; अपात्रता प्रकरणाची सुनावणी 14 जुलैला
नरेंद्र दराडे यांचा अर्ज दाखल करताना शिंदे सेनेने शक्तीप्रदर्शन केले असले तरी, यावेळी पक्षाचे आमदार सुहास कादे, सचिव भाऊसाहेब चौधरी है गैरहजर होते तसेच राष्ट्रवादीचे फक्त शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनीच हजेरी लावली. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असतांना त्यांनी त्याकडे पाठ फिरविल्याने त्याची वेगळीच चर्चा झडली. एवढेच नव्हे तर नाशिकची जबाबदारी असलेल्या भाजपाचे संकटमोचक गिरीष महाजन हे देखील अनुपस्थित असल्याने महायुतीत सारे काही अलबेल असल्याचे जाणवले नाही. यावेळी बोलतांना मंत्री दादा भुसे यांनी, महायुतीने सर्व संमतीने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिल्याचे सांगितले.
भाजपाचे गणेश गिते यांनी अर्ज दाखल केला असला तरी, महायुतीचा निर्णय रविवारी रात्री उशीरा झाला. त्यामुळे गिते यांनी तत्पुर्वी दाखल केला असेल तर त्यांची समजूत काढण्यात येणार असल्याचे सांगितले. मंत्री छगन भुजबळ यांच्याशी आपली चर्चा झाली असून, ते बाहेर आहेत. तर मंत्री महाजन है जळगावचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित असल्याने त्यांना येथे येणे शक्य होणार नसल्याचे कळविले आहे.
गणेश गिते यांचे बंधू गोकूळ गिते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला, विजयाचे गणित यांनी अलगद उलगडून सांगितले. आजपावेतो बहुमत नसतांनाच उमेदवार निवडून आल्याचे दाखले त्यांनी दिले. त्यात स्य. वसंत पवार, देवीदास पिंगळे, जयंत जाधव यांचे उदाहरणे दिले, विद्यमान आमदारांनी आठ वर्षे मतदारसंघासाठी काहीच केले नाही, ते फक्त त्यांच्यापुरतेच मर्यादित राहिले असा आरोप करून आपल्या उमेदवारीमागे कोणाचाही हात नाही. सध्या फक्त मला शिंदे सेनेचा उमेदवारच रिंगणात दिसत असून, मला मतदारांचा पूर्ण पाठिबा असल्याचे त्यांनी सांगितले, गेल्या काही दिवसांपासून आपण मतदारांच्या संपर्कात आहोत. त्यामुळे मला विजयाची खात्री आहे. आपल्या उमेदवारीमागे कोणताही राजकीय पक्ष नाही, कोणीही पाठिंबा दिलेला नाही, मात्र नजीकच्या काळात सर्वच मतदारांच्या आपण गाठीभेटी घेऊन आपली भूमिका पटवून देवू, गणेश गिते यांनी काय व कोणत्या पक्षाकडून अर्ज दाखल केला, याविषयी आपण काहीही सांगू शकत नाही, असे ते म्हणाले.






