Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर; डांबरीकरणाचे केले जात आहे पॅचवर्क

मुरूम, जीएसबी आदी साहित्य वापरून २ हजार ८१२ चौ.मी. क्षेत्रावर सर्फेसिंगचे काम करण्यात आले. पेव्हिंग ब्लॉकचा वापर करून १४९ चौ.मी. क्षेत्रावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 21, 2026 | 11:06 AM
पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासन 'अ‍ॅक्शन मोड'वर; डांबरीकरणाचे केले पॅचवर्क

पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासन 'अ‍ॅक्शन मोड'वर; डांबरीकरणाचे केले पॅचवर्क

Follow Us
Follow Us:

पुणे : शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पुणे महापालिकेच्या पथ विभागाने क्षेत्रीय कार्यालयांच्या समन्वयाने राबवलेल्या मोहिमेत ७ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधीत २७ हजार २१० चौरस मीटर क्षेत्रावर रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात आली. यामध्ये हॉटमिक्स प्लांटच्या माध्यमातून २० हजार ५६७ चौरस मीटर क्षेत्रावर डांबरीकरणाचे पॅचवर्क करण्यात आले आहे. तर कोल्डमिक्स बॅगच्या माध्यमातून ३ हजार ६८२ चौरस मीटर क्षेत्रावर डांबरीकरण करण्यात आले.

पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. त्याची दखल घेत पथ विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना खड्डे दुरुस्तीच्या सूचना दिल्या. त्यानुसार हॉटमिक्स, कोल्डमिक्स, मुरूम, जीएसबी तसेच पेव्हिंग ब्लॉकचा वापर करून दुरुस्ती करण्यात आली. या कालावधीत मुरूम, जीएसबी आदी साहित्य वापरून २ हजार ८१२ चौ.मी. क्षेत्रावर सर्फेसिंगचे काम करण्यात आले. पेव्हिंग ब्लॉकचा वापर करून १४९ चौ.मी. क्षेत्रावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली.

चाकण औद्योगिक क्षेत्राचा श्वास मोकळा होणार; ‘पीएमआरडीए’कडून 17 किमी रस्त्यांच्या कामाला वेग

क्षेत्रीय कार्यालयनिहाय हॉटमिक्स पॅचवर्कमध्ये औंध-बाणेर भागात सर्वाधिक करण्यात आले. या भागात ३ हजार ३६१ चौ.मी. क्षेत्रावर डांबरीकरण करण्यात आले. वानवडीमध्ये ३ हजार ८२ चौ.मी., धनकवडी-सहकारनगर-कात्रजमध्ये २ हजार ३० चौ.मी., कॅन्टोन्मेंटमध्ये १ हजार ६३४ चौ.मी., हडपसर-मांजरीमध्ये १ हजार २८५ चौ.मी. आणि कोथरूड-बावधनमध्ये १ हजार २०२ चौ.मी. क्षेत्रावर हॉटमिक्स पॅचवर्क करण्यात आले.

मात्र, शहरातील रस्त्यांची मोठी लांबी आणि खड्ड्यांचे वाढते प्रमाण पाहता करण्यात आलेली ही दुरुस्ती पुरेशी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळ्यात केलेले पॅचवर्क पुन्हा उखडू नये यासाठी कामांचा दर्जा आणि वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता तपासण्याची आवश्यकता आहे.

चाकण औद्योगिक क्षेत्राचा श्वास मोकळा होणार

चाकण औद्योगिक परिसरातील तीव्र वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कंबर कसली आहे. खेड तालुक्यातील बहुप्रतिक्षित ‘चाकण डी-क्लॉग वर्क’ प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कामांचा थेट ताळेबंद मांडण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी प्रत्यक्ष ६ तास सविस्तर पाहणी केली. या पाहणीदरम्यान कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना कडक शब्दांत सुनावत, मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास थेट ‘ब्लॅकलिस्ट’ (काळ्या यादीत) टाकण्याचा सज्जड दम त्यांनी दिला आहे.

Web Title: Pune municipal corporation administration in action mode to fill potholes on city roads

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • Bad Road
  • pune news
  • Traffic Issue

संबंधित बातम्या

Pune News : छायाचित्रांतील जगलेले क्षण पुन्हा आठवणी जागवतात; प्रियदर्शनी भोर यांचे उद्गार
1

Pune News : छायाचित्रांतील जगलेले क्षण पुन्हा आठवणी जागवतात; प्रियदर्शनी भोर यांचे उद्गार

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात
2

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम
3

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा
4

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.