Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Wari 2026 : यंदाच्या आषाढी वारीच्या नियोजनात मोठा बदल; ‘या’ तारखेला निघणार माऊलींची पालखी

अधिक मासामुळे यंदाच्या आषाढी वारीच्या नियोजनात मोठा बदल झाला असून, राज्यातील संतांच्या पालख्या नेहमीपेक्षा सुमारे एक महिना उशिराने श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 02, 2026 | 02:29 PM
यंदाच्या आषाढी वारीच्या नियोजनात मोठा बदल; 'या' तारखेला निघणार माऊलींची पालखी

यंदाच्या आषाढी वारीच्या नियोजनात मोठा बदल; 'या' तारखेला निघणार माऊलींची पालखी

Follow Us
Follow Us:

नीरा : अधिक मासामुळे यंदाच्या आषाढी वारीच्या नियोजनात मोठा बदल झाला असून, राज्यातील संतांच्या पालख्या नेहमीपेक्षा सुमारे एक महिना उशिराने श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. वारकऱ्यांच्या भक्तीभावात व उत्साहात मात्र कुठलाही फरक पडलेला नसून ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात वारीची परंपरा यंदाही तेवढ्याच भक्तिभावाने पार पडणार आहे. मात्र यावर्षी वारकऱ्यांची आणि विठुरायाची भेट एक महिना उशिराने होणार आहे.

 

तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासामुळे यंदा आषाढी वारीचे वेळापत्रक पुढे ढकलले गेले आहे. १७ मेपासून सुरू झालेला अधिक मास १५ जूनपर्यंत असल्याने दरवर्षी मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात निघणारे पालखी सोहळे यंदा २४ जूनपासून क्रमाक्रमाने पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. वारकरी संप्रदायाची हजारो वर्षांची अखंड परंपरा असलेल्या पंढरीच्या वारीबाबत संतांनी अभंगातून सांगितले आहे.

राज्यातील मानाच्या सात पालख्यांचे प्रस्थान

संत मुक्ताईंची पालखी २४ जून रोजी कोथळी-मुक्ताईनगर येथून प्रस्थान होणार आहे. संत निवृत्तीनाथ महाराज २९ जून रोजी त्र्यंबकेश्वरहून, संत तुकाराम महाराज व संत एकनाथ महाराज ७ जुलै रोजी अनुक्रमे देहू व पैठणहून प्रस्थान ठेवणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ८ जुलै रोजी आळंदीहून, तर संत सोपानदेव महाराजांची पालखी १२ जुलै रोजी सासवडहून मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, आषाढ शुद्ध दशमी (२४ जुलै) रोजी संत नामदेव महाराज पंढरपूरजवळील इसबावी येथे विसावा पादुकांवर सर्व संतांच्या भेटीस येणार असून, शनिवार दि. २५ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा भक्तिभावात साजरा होणार आहे.

हे सुद्धा वाचा : भोंदूबाबा प्रकरणावरुन सपकाळांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी, म्हणाले; आता खरातची…

पालखी मुक्कामासाठी भवानी पेठेतच पर्याय

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुणे मुक्कामी भवानी पेठेतील पारंपरिक जागा बदलू नये, अशी मागणी भवानी पेठ येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टने केली आहे. पालखीचा मुक्काम सध्याच्या विठोबा मंदिरातून हलवायचा असल्यास तो स. प. महाविद्यालय किंवा इतर ठिकाणी न नेता भवानी पेठेतीलच श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात ठेवावा, असा पर्याय ट्रस्टने सुचविला आहे. याठिकाणी दर्शन व्यवस्था, रथ व्यवस्थापन, वाहनतळ तसेच अश्वजोडी व बैलजोडींसाठीही पुरेशी सुविधा उपलब्ध असल्याचा दावा ट्रस्टचे अध्यक्ष वीरेंद्र किराड यांनी केला आहे. भवानी पेठेतील मंडळे, संस्था आणि सेवाभावी नागरिकांना या परंपरेतून वंचित राहावे लागू नये, हा या प्रस्तावामागील मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: A major change has been made in the planning for this years ashadhi wari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Palkhi Sohala
  • pune news

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
3

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
4

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.