Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दौंड तालुक्यात भेसळयुक्त गुळाचा काळा धंदा, दारूसाठी परराज्यात पुरवठा; विनापरवाना गुऱ्हाळांवर कारवाईची मागणी

साखरपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दौंड तालुक्यातील अनेक गुऱ्हाळांमध्ये शुद्ध गुळाऐवजी भेसळयुक्त गुळ तयार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 05, 2026 | 01:23 PM
दौंड तालुक्यात भेसळयुक्त गुळाचा काळा धंदा, दारूसाठी परराज्यात पुरवठा; विनापरवाना गुऱ्हाळांवर कारवाईची मागणी

दौंड तालुक्यात भेसळयुक्त गुळाचा काळा धंदा, दारूसाठी परराज्यात पुरवठा; विनापरवाना गुऱ्हाळांवर कारवाईची मागणी

Follow Us
Follow Us:

पाटस : साखरपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दौंड तालुक्यातील अनेक गुऱ्हाळांमध्ये शुद्ध गुळाऐवजी भेसळयुक्त गुळ तयार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा भेसळयुक्त गुळ थेट दारू निर्मितीसाठी महाराष्ट्रासह परराज्यात पुरवला जात असल्याची माहिती आहे. धक्कादायक म्हणजे अशी अनेक गुऱ्हाळे विनापरवाना आणि बेकायदा सुरू असून त्यांचे चालक-मालक बहुतांश परप्रांतीय आहेत. अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी शेतकरी आणि नागरिकांनी केली आहे.

 

शुद्ध गुळाला बाजारभाव मिळत नसल्याचा फायदा घेत काही गुऱ्हाळधारक दुषीत साखर, रसायने आणि हानिकारक घटक मिसळून कमी खर्चात गुळ तयार करत आहेत. हा भेसळयुक्त गुळ स्थानिक बाजारात न विकता तो थेट बेकायदा दारू निर्मितीसाठी महाराष्ट्रातील काही भागात आणि परराज्यात पाठवला जातो. त्यामुळे राज्याच्या महसुलाचे नुकसान होत असून, आरोग्यासाठीही मोठा धोका निर्माण झाला आहे.

तालुक्यातील अनेक गुऱ्हाळांना उत्पादन परवाना, प्रदूषण नियंत्रण मंडळाची एनओसी, कामगार नोंदणी यासारख्या कोणत्याही कायदेशीर परवानग्या नाहीत. तरीही ही गुऱ्हाळे बिनदिक्कतपणे सुरू आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या गुऱ्हाळांचे चालक आणि मालक हे बहुतांश इतर राज्यांमधील असून त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. मात्र या गुऱ्हाळांवर कोणी कारवाई करण्यास आले तर जागामालक पुढाकार घेत राजकीय पॉवर आणि आर्थिक तडजोड करून जागीच मिटवले जाते.

“शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा लुटून हा भेसळयुक्त गुळाचा आणि बेकायदा दारूचा धंदा फोफावतोय. विनापरवाना सुरू असलेली गुऱ्हाळे तातडीने सील करावीत. परप्रांतीयांकडून होणाऱ्या या बेकायदा धंद्यावर आळा घालण्यासाठी पोलिस, महसूल, अन्न व औषध प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करावी” अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

भेसळयुक्त गुळामुळे खऱ्या गुळाला बाजारात भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. प्रशासनाने तातडीने सर्व गुऱ्हाळांची तपासणी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि नागरिक करत आहेत. दरम्यान, दौंड तालुक्यात सध्या भेसळयुक्त दुध, दुधाचे पदार्थ, खाद्य तेल, फळे, दुषीत पिण्याचे पाणी तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंमध्ये रासायनिक औषधांचा वापर केला जात आहे.

हे सुद्धा वाचा : ६ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पासाठी शिवाजीनगर एसटी प्रशासनाचा नवा प्लॅन; आरे’च्या जागेची मागणी

अन्न औषध प्रशासन विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

याबाबत तक्रारी करुन ही पुणे आणि बारामती अन्न औषध प्रशासन विभागाचे संबंधित अधिकारी दौंड तालुक्यातील होणाऱ्या या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. तर काही ठिकाणी कारवाई केल्याचे कागदावर दाखवुन कारवाईचा दिखावा केला जात असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत. त्यामुळे अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तुकाराम मुंडे यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तालुक्यातील भेसळयुक्त गुळ निर्माण करणाऱ्या गुऱ्हाळांवर तातडीने धाडी टाकून कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान अन्न औषध प्रशासन विभागाच्या या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Allegations are being made that adulterated jaggery is being produced in daund taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Daund News
  • Daund Police

संबंधित बातम्या

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
1

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
2

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Maharashtra Drought : शब्द गोल गोल फिरवू नका… दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा सीएमवर हल्लाबोल
3

Maharashtra Drought : शब्द गोल गोल फिरवू नका… दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा सीएमवर हल्लाबोल

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह
4

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.