Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहन सुरवसे-पाटलांच्या पाठपुराव्याला यश; चंदननगर दुय्यम निबंधक कार्यालयातील कथित गैरप्रकारांची होणार चौकशी

चंदननगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजाबाबत तक्रारी आणि आरोप समोर आल्यानंतर सुरवसे-पाटील यांनी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 27, 2026 | 06:34 PM
रोहन सुरवसे-पाटलांच्या पाठपुराव्याला यश; चंदननगर दुय्यम निबंधक कार्यालयातील कथित गैरप्रकारांची होणार चौकशी

रोहन सुरवसे-पाटलांच्या पाठपुराव्याला यश; चंदननगर दुय्यम निबंधक कार्यालयातील कथित गैरप्रकारांची होणार चौकशी

Follow Us
Follow Us:
  • रोहन सुरवसे-पाटलांच्या पाठपुराव्याला यश
  • सह दुय्यम निबंधक महादेव गुरव यांना झटका
  • कथित गैरप्रकारांची होणार चौकशी
पुणे : हवेली क्रमांक सात, चंदननगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीची प्रशासनाने दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठित केली आहे. त्यामुळे सह निबंधक महादेव गुरव यांना मोठा झटका बसला आहे.

चंदननगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजाबाबत तक्रारी आणि आरोप समोर आल्यानंतर सुरवसे-पाटील यांनी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. कार्यालयातील कागदपत्रांची हाताळणी, कामकाजाची पद्धत तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी हवेली क्रमांक आठच्या सहायक दुय्यम निबंधक वर्ग-२ संगिता कुरळे (पवार) यांच्या नेतृत्वाखाली चौकशी पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता चंदननगर कार्यालयातील कथित गैरप्रकारांची चौकशी होणार आहे.

दरम्यान, चौकशी समिती गठित झाल्यानंतरही सुरवसे-पाटील यांनी चौकशीच्या निष्पक्षतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी समकक्ष अधिकाऱ्यांमार्फत न करता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ‘चौकशी केवळ औपचारिकता ठरू नये. संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी सुरवसे-पाटील यांनी केली. त्यामुळे चौकशी समितीच्या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, या चौकशीत नेमके काय समोर येते आणि दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासन कोणती कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा : काळजी घ्या ! पुणे, पिंपरी-चिंचवडसह उपनगरांमध्ये स्वाईन फ्लू, डेंग्यूसह तापाच्या रुग्णांत मोठी वाढ

Web Title: An inquiry will be conducted into alleged irregularities at the chandannagar sub registrars office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • NCP News
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Homes: पुण्यात घर खरेदीदारांची माघार! ३ महिन्यात घटली घरांची मागणी; अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर
1

Pune Homes: पुण्यात घर खरेदीदारांची माघार! ३ महिन्यात घटली घरांची मागणी; अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर

पुण्यात Badminton चा थरार! मानांकन असूनही पराभव; ‘या’ युवा खेळाडूंनी रचला इतिहास
2

पुण्यात Badminton चा थरार! मानांकन असूनही पराभव; ‘या’ युवा खेळाडूंनी रचला इतिहास

Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनावरून सासवडमध्ये कौटुंबिक वाद विकोपाला
3

Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनावरून सासवडमध्ये कौटुंबिक वाद विकोपाला

मिडासएक्स कंपनीची गुंतवणूक क्षेत्रात झेप; एमएफ युटिलिटीज इंडियासोबत केली धोरणात्मक भागीदारी
4

मिडासएक्स कंपनीची गुंतवणूक क्षेत्रात झेप; एमएफ युटिलिटीज इंडियासोबत केली धोरणात्मक भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.