मेट्रोच्या विस्तारीकरण आराखड्यास मान्यता (फोटो - istockphoto )
पुणे: मेट्राेच्या हडपसर ते लाेणीकंद आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्थानक या दाेन मार्गांच्याविस्तारीकरणाच्या आराखड्यास महापािलकेच्या मुख्यसभेने मान्यता दिली आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि महामेट्राे यांनी पुणे महापालिका क्षेत्रासाठी सर्वंकष वाहतुक विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार पुणे शहराचा भविष्यात हाेणारा विस्तार आणि विकास लक्षात घेऊन मेट्राे मार्गांचा अधिक विस्तार करण्याची गरज या अहवालात व्यक्त केली आहे.
तसेच पुणे एकिकृत महानगर परिवहन प्राधिकरण ( पुम्टा )च्या बैठकीत हडपसर ते लाेणी काळभाेर आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्थानक या दाेन मेट्राे मार्गिंकाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेण्यात अाला हाेता. त्यानुसार हा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या अहवालास महापालिकेच्या मुख्यसभेने मान्यता दिली आहे.
या विस्तारीत प्रकल्पासाठी महापालिकेला जमीनीच्या पाेटी सुमारे ३ काेटी ६० लाख रुपये इतके याेगदान द्यावे लागणार आहे. या मार्गिकांना केंद्र आणि राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर हे पैसे द्यावेत, त्यासंदर्भात महामेट्राेशी करारनामा करावा, हा प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या काेणत्याही कर्जाची हमी महापािलका घेणार नाही, प्रकल्प राबविण्यासाठी महामेट्राेकडून राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, या दाेन्ही मार्गिकांचा विकास अाराखड्यात समावेश करावा असेही या प्रस्तावात नमूद केले आहे.
पुण्यातील ‘हा’ भुयारी मार्ग बदलण्याचा महामेट्रोचा मार्ग; मात्र नक्की कारण काय?
स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्राे मार्गाचे आरेखन बदलण्यात आले आहे. हा मार्ग आता शंकर महाराज समाधी मठाच्या खालून जाणार नाही असे महामेट्राेने स्पष्ट केले आहे. पुणे शहरातील मेट्राे मार्गांचे विस्तारीकरण केले जाणार आहे. यामध्ये इतर मेट्राे मार्गाप्रमाणेच स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा समावेश आहे. हा मार्ग भुयारी असुन, ताे सातारा रस्त्यावर धनकवडी येथील शंकर महाराज समाधी मठाच्या खालून जात आहे. अशी माहीती पुढे आली हाेती. सदर मार्ग हा समाधी मठाच्या खालून जात असल्याने मठाचे विश्वस्त, प्रशासन यांनी महामेट्राेला सदर मार्ग समाधी मठाच्या खालून नेण्यात येऊ नये अशी मागणी केली हाेती. या मागणीची महामेट्राेने दखल घेतली आहे.
हेही वाचा: Pune Metro News: पुण्यातील ‘हा’ भुयारी मार्ग बदलण्याचा महामेट्रोचा मार्ग; मात्र नक्की कारण काय?
महामेट्राेने श्री सदगुरु संतवर्य याेगीराज शंकरमहाराज समाधी ट्रस्टला पत्र पाठविले आहे. सदर मार्गचे आरेखन बदलण्यात आले आहे. समाधीच्या बाहेरून मार्गस्थ करण्यासाठी मार्गिकेचे आरेखन सुधारीत केले जात आहे. महामेट्राेने शहरातील मध्यभागातून भुयारी मार्ग आणि स्टेशन उभारले आहे. हे उभारताना परीसरातील काेणत्याही इमारतीला हानी पाेहचणार नाही याची काळजी घेतली आहे. त्याचप्रमाणे शंकर महाराज समाधी स्थळास काेणतीही हानी पाेहचणार नाही यासाठी महामेट्राे कटिबद्ध असल्याचे पत्रात नमूद केले आहे. त्याच प्रमाणे पद्मावती येथील मेट्राे स्थानकास नाव देण्यासंदर्भात याेग्य ती कार्यवाही केली जाईल असेही पत्रात म्हटले आहे.