Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Death: अजित पवारांचा मृत्यू झाला तो बारामतीचा विमानतळ कसा आहे? कोणाकडे आहे व्यवस्थापनाची जबाबदारी

बारामती विमानतळावर एटीसी आणि आयएलएस यंत्रणेचा अभाव असल्याने अजित पवारांचा विमान अपघात झाला का? जाणून घ्या डीजीसीएने या विमानतळाला 'अनियंत्रित' का घोषित केले आहे आणि अपघातामागील तांत्रिक कारणे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 29, 2026 | 05:48 PM
अजित पवारांचा मृत्यू झाला तो बारामतीचा विमानतळ कसा आहे? (photo Credit- X)

अजित पवारांचा मृत्यू झाला तो बारामतीचा विमानतळ कसा आहे? (photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • अजित पवारांचा मृत्यू झाला तो बारामतीचा विमानतळ कसा आहे?
  • कोणाकडे आहे व्यवस्थापनाची जबाबदारी
  • विमानतळांची श्रेणी आणि बारामतीचे स्थान
Baramati Airport Accident: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर आता बारामती विमानतळाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या विमानतळावर देशातील मोठे नेते आणि व्हीव्हीआयपी विमाने उतरतात, ते विमानतळ तांत्रिकदृष्ट्या किती ‘असुरक्षित’ आहे, याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) स्वतः या विमानतळाला ‘अनियंत्रित’ (Uncontrolled Airport) मानत असल्याने खळबळ उडाली आहे.

विमानतळाचे व्यवस्थापन नक्की कोणाचे?

पुण्यापासून ९५ किमी अंतरावर असलेल्या बारामती विमानतळाचा वापर प्रामुख्याने पायलट प्रशिक्षणासाठी केला जातो. हे विमानतळ ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ’ (MIDC) च्या अखत्यारीत येते आणि त्याचे व्यवस्थापन ‘बारामती विमानतळ लिमिटेड’ (BAL) करते. २००९ मध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला विकासासाठी हे विमानतळ दिले होते, परंतु विकास न झाल्याने २०२५ मध्ये एमआयडीसीने ते पुन्हा ताब्यात घेतले.

अपघाताच्या दिवशी ‘त्या’ त्रुटी ठरल्या जीवघेण्या?

१. एटीसी (ATC) ची कमतरता

बारामती विमानतळावर पूर्णवेळ एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) नाही. डीजीसीएच्या नियमानुसार, येथील एटीसी सपोर्ट फ्लाइंग स्कूलमधील विद्यार्थी किंवा प्रशिक्षक पुरवतात. अपघाताच्या दिवशीही कार्व्हर एव्हिएशनचे प्रशिक्षक एटीसीचे काम पाहत होते. कोणत्याही व्यावसायिक एटीसी तज्ज्ञाशिवाय व्हीव्हीआयपी लँडिंग होणे हा मोठा धोका मानला जातो.

२. दृश्यमानतेचा (Visibility) अडथळा:

अपघाताच्या वेळी दृश्यमानता केवळ ३ किलोमीटर होती, तर सुरक्षित उड्डाणासाठी ती ५ किलोमीटर असणे आवश्यक आहे. दृश्यमानता कमी असल्याने वैमानिकाने पहिले लँडिंग रद्द केले आणि विमान पुन्हा हवेत घेण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळी दुर्घटना घडली.

Maharashtra Politics: अजित पवारांच्या निधनाने बदलणार राजकीय समीकरणे..’ NCPचे दोन्ही गट एकत्र येणार की महायुतीत फूट पडणार?

३. आधुनिक यंत्रणेचा अभाव:

निवृत्त पायलट एहसान खालिद यांच्या मते, बारामतीची धावपट्टी ७,७१० फूट लांब आहे, जी पुरेशी आहे. मात्र, तिथे ILS (Instrument Landing System) नाही. जर आयएलएस यंत्रणा असती, तर कमी दृश्यमानतेतही वैमानिकाला अचूक मार्गदर्शन मिळाले असते आणि हा अपघात टाळता आला असता.

विमानतळांची श्रेणी आणि बारामतीचे स्थान

भारतातील विमानतळे चार श्रेणीत विभागलेली आहेत:

श्रेणी ‘अ’ (बारामती): कोणतीही हवाई वाहतूक नियंत्रण सेवा नसलेले अनियंत्रित विमानतळ.

श्रेणी ‘ड’ (मुंबई-दिल्ली): रडार-आधारित पूर्णपणे नियंत्रित विमानतळ. दुर्दैवाने, बारामती हे श्रेणी ‘अ’ मध्ये येते, जिथे पायाभूत सुविधांची प्रचंड कमतरता आहे.

हवाई दलाने (IAF) आता सांभाळली सूत्रे

बुधवारच्या विमान अपघातानंतर, भारतीय हवाई दलाने विमानतळावर एक समर्पित पथक तैनात केले, जे घटनास्थळी सुरक्षित हवाई ऑपरेशन्सना समर्थन देण्यासाठी आवश्यक हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) आणि हवामानशास्त्रीय सेवा प्रदान करत होते. हवाई दलाच्या मते, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून त्यांनी हवाई योद्ध्यांची एक समर्पित पथक तैनात केले.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अकाली निधनाने वस्त्रोद्योगाचे पाठबळ हरपले; इचलकरंजीला दिले झुकते माप

Web Title: Baramati airport management and safety status ajit pawar plane crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar plane crash
  • baramati

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राज्यात मोठ्या हालचाली; ZP इलेक्शनबाबत ‘हा’ मोठा निर्णय
1

Maharashtra Politics: राज्यात मोठ्या हालचाली; ZP इलेक्शनबाबत ‘हा’ मोठा निर्णय

Ajit Pawar Death: “ते केवळ राजकारणी नव्हते तर…” अजित दादांच्या निधनानंतर आमदार सत्यजित तांबे झाले व्यक्त
2

Ajit Pawar Death: “ते केवळ राजकारणी नव्हते तर…” अजित दादांच्या निधनानंतर आमदार सत्यजित तांबे झाले व्यक्त

कोण आहेत Sunetra Pawar? अजितदादांच्या निधनानंतर आता राज्याच्या ‘उपमुख्यमंत्री’ पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा!
3

कोण आहेत Sunetra Pawar? अजितदादांच्या निधनानंतर आता राज्याच्या ‘उपमुख्यमंत्री’ पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा!

अजित पवारांच्या सुरक्षारक्षकाला दुसऱ्या दिवशीही अश्रू अनावर; इम्तियाज मोमीन घटनास्थळी ढसा ढसा रडले
4

अजित पवारांच्या सुरक्षारक्षकाला दुसऱ्या दिवशीही अश्रू अनावर; इम्तियाज मोमीन घटनास्थळी ढसा ढसा रडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.