Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Municipal Election : पुण्यात भाजपची जोरदार मुसंडी; प्रभाग क्रमांक ३३ (क) मधून सुभाष नाणेकर विजयी

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३३ (क) मधून भाजपचे सुभाष मुरलीधर नाणेकर विजयी झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 16, 2026 | 04:15 PM
पुण्यात भाजपची जोरदार मुसंडी; प्रभाग क्रमांक ३३ (क) मधून सुभाष नाणेकर विजयी

पुण्यात भाजपची जोरदार मुसंडी; प्रभाग क्रमांक ३३ (क) मधून सुभाष नाणेकर विजयी

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यात भाजपची जोरदार मुसंडी
  • सुभाष नाणेकर विजयी
  • भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर
पुणे : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडलं. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, लवकरच सर्व प्रभागाचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. आजच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही जागांचे निकाल हाती आले आहेत. पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३३ (क) मधून भाजपचे सुभाष मुरलीधर नाणेकर विजयी झाले आहेत.

सुभाष नाणेकर हे उत्तमनगरचे संरपंचही होते. गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला होता. भाजपमधील बडे नेतेही नाणेकर यांच्यासाठी प्रचाराला आले होते. त्यांच्या विरोधातील उमेदवारांनीही जोरदार प्रचार केला होता. मात्र जनतेने नाणेकर यांना निवडून दिले आहे. संरपंचपदी असताना नाणेकर यांनी उत्तमनगर भागातील अनेक नागरिकांच्या समस्या सोडविल्या आहेत, नगरसेवक झाल्यानंतर या भागात मोठा विकास होईल, असं त्यांच्या समर्थकांकडून बोललं जात होतं. नाणेकर यांचा विजय झाल्यामुळे या भागाचा विकास होईल का, हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

गेल्या काही दिवसाखाली नाणेकर यांनी नवराष्ट्रला मुलाखत दिली होती. नागरिकांच्या अनेक समस्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. पाण्याचा प्रश्न मिटवणार असल्याचीही त्यांनी ग्वाही दिली होती. तसेच मी सरपंच असताना उत्तमनगर भागात अनेक नागरिकांच्या सोडविल्या, असंही त्यांनी सांगितलं होतं. नाणेकर हे भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.

हे सुद्धा वाचा : चार आमदार अन् दोन माजी माझ्या विरोधात लढत होते, पण…; विजयानंतर प्रशांत जगतापांची प्रतिक्रीया

पुण्यात भाजपची जोरदार मुसंडी

भाजप पुन्हा एकदा पुणे महापालिकेच्या चाव्या आपल्या हातात घेणार असं दिसत आहे. कारण आतापर्यंत समोर आलेले कल पाहता भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरशीची लढाई होणार अशी आशा सर्वांना होती. पण तसे काही दिसले नाही, कारण भाजप एकहाती सत्ता आणणच्या तयारीत आहे. दादांनी आपली सगळी ताकद लावलेली पण मतदारांनी आपला कौल भाजपच्या पारड्यात टाकलेला दिसत आहे. पुणे महापालिकेत एकूण 165 जागा असून, भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे.

Web Title: Bjp candidate subhash nanekar has won the pune municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Election Result
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • PMC Election 2026
  • pune news

संबंधित बातम्या

पुणे महापालिकेत भाजपाच्या नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी, काँग्रेस नगरसेवकांचेही प्रत्त्युत्तर; नेमकं काय घडलं?
1

पुणे महापालिकेत भाजपाच्या नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी, काँग्रेस नगरसेवकांचेही प्रत्त्युत्तर; नेमकं काय घडलं?

Baramati by election : “दादा खरंच गेलाय का…? तो शेवटचा फोन अन् भेट; MP सुप्रिया सुळेंनी मांडल्या भावना
2

Baramati by election : “दादा खरंच गेलाय का…? तो शेवटचा फोन अन् भेट; MP सुप्रिया सुळेंनी मांडल्या भावना

वित्तीय समिती बंद करणार नाही; पुणे महापालिका आयुक्तांनी थेट नगरसेवकांनाच ठणकावले
3

वित्तीय समिती बंद करणार नाही; पुणे महापालिका आयुक्तांनी थेट नगरसेवकांनाच ठणकावले

नगरसेवक अमाेल बालवडकरांच्या आरोपानंतर महापौरांकडून चौकशीचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4

नगरसेवक अमाेल बालवडकरांच्या आरोपानंतर महापौरांकडून चौकशीचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.