Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडगावातील एमआयडीसी रस्त्यावर पार्किंगचा विळखा, वाहतूक कोंडीमुळे अपघाताची भीती; तातडीच्या कारवाईची मागणी

वडगाव-तळेगाव नगरपंचायत हद्दीतील विशाल लॉन्स चौक परिसरातील एमआयडीसी रस्त्यावर अवजड वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 21, 2026 | 12:30 AM
वडगावातील एमआयडीसी रस्त्यावर पार्किंगचा विळखा, वाहतूक कोंडीमुळे अपघाताची भीती; तातडीच्या कारवाईची मागणी

वडगावातील एमआयडीसी रस्त्यावर पार्किंगचा विळखा, वाहतूक कोंडीमुळे अपघाताची भीती; तातडीच्या कारवाईची मागणी

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : वडगाव-तळेगाव नगरपंचायत हद्दीतील विशाल लॉन्स चौक परिसरातील एमआयडीसी रस्त्यावर अवजड वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. रस्त्याच्या दुतर्फा डंपर, कंटेनर, ट्रक आणि इतर मालवाहू वाहने तासन्‌तास उभी राहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असून वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या मार्गावर मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करत नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

 

विशाल लॉन्स चौक हा एमआयडीसी परिसराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांची सतत वर्दळ असल्याने हा मार्ग दिवसभर गजबजलेला असतो. मात्र, रस्त्यावरच अवजड वाहने उभी केल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होत असून वाहतुकीचा वेग मंदावत आहे. परिणामी अनेकदा लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या वाहनांमुळे समोरून येणारी वाहने वेळेवर दिसत नसल्याने ओव्हरटेक करताना तसेच रस्ता ओलांडताना अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः सकाळी शाळा आणि कंपन्यांच्या कामकाजाच्या वेळेत तसेच सायंकाळी सुटीनंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गंभीर दुर्घटना घडण्याची भीती

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वाहनचालक रस्त्यालगत उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागा किंवा अधिकृत पार्किंगचा वापर न करता मुख्य रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दल किंवा अन्य अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही मार्ग काढणे कठीण होत आहे. यापूर्वीही या परिसरात किरकोळ अपघात झाल्याच्या घटना घडल्या असून वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा : कोट्यवधींच्या व्हीएमडी स्क्रीन धूळ खात, देखभालीसाठी निधीच नाही; महापालिका प्रशासनाची कबुली

वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी

वाहतूक पोलिसांनी या मार्गावर नियमित गस्त वाढवून बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, ‘नो पार्किंग’चे फलक उभारावेत, आवश्यकतेनुसार टोईंग व्हॅनच्या साहाय्याने वाहने हटवावीत तसेच वाहतुकीचे प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि कामगार वर्गातून होत आहे. संबंधित प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना केल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल आणि संभाव्य अपघात टाळता येतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Citizens are angry due to traffic congestion on the midc road in vadgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • maharashtra
  • Traffic Police
  • Vadgaon Maval

संबंधित बातम्या

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण
1

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याने बदलणार नाशिकचा वाहतूक नकाशा; ६५.६ किमी रिंग रोडसह १,४३५ किमी रस्त्यांचा महाप्रकल्प
2

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याने बदलणार नाशिकचा वाहतूक नकाशा; ६५.६ किमी रिंग रोडसह १,४३५ किमी रस्त्यांचा महाप्रकल्प

Gondiya News: रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; बिबट्याचे मुंडके-धड झाले वेगळे! महालगाव शिवारातील घटना
3

Gondiya News: रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; बिबट्याचे मुंडके-धड झाले वेगळे! महालगाव शिवारातील घटना

Nitesh Rane: दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा
4

Nitesh Rane: दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.