Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीत तुफान स्पर्धा; पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ नावाचीही जोरदार चर्चा

विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) यावेळी आक्रमक पवित्रा घेतला आहे. योगेश बहल यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 28, 2026 | 04:42 PM
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीत तुफान स्पर्धा; पिंपरी-चिंचवडमधील 'या' नावाचीही जोरदार चर्चा

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीत तुफान स्पर्धा; पिंपरी-चिंचवडमधील 'या' नावाचीही जोरदार चर्चा

Follow Us
Follow Us:

पिंपरी : विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) यावेळी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहराला आजवर विधान परिषदेवर प्रतिनिधित्व न मिळाल्याने निर्माण झालेला ‘बॅकलॉग’ भरून काढण्यासाठी शहरातील २५ हून अधिक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी मुंबईत पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना भेटून शहराध्यक्ष योगेश बहल यांना उमेदवारी देण्याची लेखी मागणी यावेळी करण्यात आली.

 

या शिष्टमंडळात माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, माजी उपमहापौर डब्बू आसवाणी, सीमा सावळे, वैशाली काळभोर, अतुल शितोळे, जितेंद्र ननावरे, फजल शेख, संतोष बारणे, राजेंद्र जगताप, प्रकाश सोमवंशी, निकिता कदम, विकास साने, राजू बनसोडे, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, उज्वला ढोरे, प्रियंका कुदळे यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२५ माजी नगरसेवकांचे ‘देवगिरी’वर शक्तिप्रदर्शन

येत्या १२ मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी राज्यभरातून मोठी चढाओढ आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या शिष्टमंडळाने सोमवारी मुंबईतील ‘देवगिरी’ निवासस्थानी धाव घेत आपली दावेदारी भक्कम केली. ३७ पैकी २५ माजी नगरसेवकांसह सुमारे ५० पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांनी दिल्याची माहिती शहर कार्याध्यक्ष फजल शेख व माजी नगरसेविका वर्षा जगताप यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : तू माझी नाही झालीस, तर कुणाचीच होऊ देणार नाही; कोंढव्यात तरुणीचा पाठलाग करून मारहाण

योगेश बहल यांच्याच नावाचा आग्रह का?

निवेदनात माजी महापौर योगेश बहल यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा दाखला देण्यात आला आहे. बहल यांनी १९९२ पासून सलग सात वेळा नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी पालिकेत: महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, दोन वेळा शहराध्यक्ष अशा सर्व महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ते अजित पवार यांचे अत्यंत निष्ठावान मानले जातात. त्यांच्या अनुभवाचा फायदा शहराच्या विकासाला आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी होईल, असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे.

Web Title: Demand is being made to give yogesh bahl a chance on a seat in the legislative council

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • NCP News
  • Pimpri Chinchwad
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
1

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

बीडकरांचं पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा; सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजितदादांचा शब्द पाळला’
2

बीडकरांचं पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा; सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजितदादांचा शब्द पाळला’

गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार
3

गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’
4

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.