शाळेमधील विद्यार्थांनी संशोधनातून शोधले उपाय(फोटो-सोशल मीडिया)
पुणे : भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या पुणे नॉलेज क्लस्टरने सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या सहकार्याने आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे एज्युकॉनक्लेव्ह ३.० या दोन दिवसीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन केले होते त्यात भविष्यासाठी सज्ज शिक्षणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या पुण्यातील परिषदेत ७५० हून अधिक विद्यार्थ्यांकडून १०० पेक्षा अधिक नवकल्पनांचे सादरीकरण केले.
‘सलाम बॉम्बे फाउंडेशन’ (SBF) ही संस्था पुणे, मुंबईतील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्यातील कौशल्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्यात उद्योजकता रुजवण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डिपार्टमेंट ऑफ जियॉलॉजि येथे एज्युकॉनक्लेव्ह ३.० ‘ टेकव्हिजन’ हा सोहळा संपन्न झाला. यावेळी पुणे नॉलेज क्लस्टरच्या अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रियानगराज, आययुसीएए चे संचालक प्रा. रघुनाथन आनंद, प्रा. मिलिंद वाटवे, सलाम बॉम्बे फाउंडेशनचे गौरव अरोरा यावेळी उपस्तित राहून पत्रकारांशी संवाद साधला आहे.
डॉ. प्रिया नगराज म्हणाल्या, “एज्युकॉन्क्लेव्ह च्या तिसऱ्या वर्षाचे यजमानपद भूषवताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. यावर्षीचा भर शालेय शिक्षणात डिजिटल अध्यापन पद्धतींच्या समावेशावर आहे. ७० हून अधिक सहभागी आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी-नेतृत्वाखालील प्रदर्शन हे यावर्षीच्या परिषदेचे वैशिष्ट्य आहे. पुण्यातील शिक्षण व एसटीईएम शिक्षण परिषदांची ही परंपरा पुढेही सुरू राहो आणि ही परिषद देशभरातील शिक्षक व संस्थांसाठी एक प्रमुख व्यासपीठ ठरो, अशी आमची अपेक्षा आहे.”
साहील गुप्ता हा मुंबईचा इयत्ता नववीचा विद्यार्थी आहे. सर्वसाधारण रुग्णालयात गेल्यानंतर अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यामध्ये रुग्णाला सलाईन लावण्याचे काम परिचारिका (नर्स) करतात. अनेक वेळा सलाईन संपल्यानंतरही वेळेवर लक्ष न दिल्यास शिरेतील रक्त मागे येण्याची शक्यता असते. ही समस्या लक्षात घेऊन आम्ही त्यावर उपाय शोधला आहे. आम्ही तयार केलेल्या मशीनद्वारे सलाईनमध्ये किती द्रव शिल्लक आहे, हे वेळोवेळी दाखवले जाईल. सलाईन पूर्ण संपल्यावर मशीनमधील बजर वाजेल, त्यामुळे नर्सला त्वरित माहिती मिळेल. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांनाही याची सूचना मिळेल. अशा प्रकारचा उपयुक्त शोध आम्ही केला आहे.
मी अर्जून विश्वासराव, इयत्ता ९ वीचा विद्यार्थी आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस आमच्यासाठी सलाम बॉम्बे संस्थेचे एक महिन्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. आम्हाला विविध क्षेत्रांतील समस्या अभ्यासायला सांगितल्या. त्यातून मला सर्वाधिक आवडलेले आणि महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्र. शेतकऱ्याच्या समस्या जानून संशोधन केल आहे.
या समस्यांवर उपाय म्हणून मी स्वयंचलित शेती रोबोटचा प्रकल्प विकसित केला. या उपक्रमात शेताचे निरीक्षण, मातीतील ओलावा, तापमान, आर्द्रता, वनस्पतींची वाढ आणि पर्यावरणीय स्थिती तपासली जाते. रोबोटद्वारे स्वयंचलित सिंचन, कीटक नियंत्रण आणि डेटा थेट शेतकऱ्याच्या मोबाईलवर पाठवण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे शेती अधिक स्मार्ट, कार्यक्षम आणि शेतकरी-सुलभ होण्यास मदत होते. अर्जुन विश्वासराव आणि सोहम महजारे यांनी विकसित केलेला हा रोबोट मातीची स्थिती तपासून केवळ आवश्यक भागांनाच पाणी देतो, किडींपासून संरक्षण करतो आणि शेतकऱ्याच्या मोबाईलवर रिअल-टाइम माहिती पाठवतो.
“राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी सुसंगत राहून संसाधन-अभावी पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसाठी एसटीईएम शिक्षणातील दरी कमी करणे हे एज्युकॉन्क्लेव्ह चे प्रमुख उद्दिष्ट आहे.” -सलाम बॉम्बे फाउंडेशनचे गौरव अरोरा






