भारतीय संघाची केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिराला दिली भेट(फोटो-सोशल मीडिया)
Indian cricketers visited the Sree Padmanabhaswamy Temple : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची T20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे खेळला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघ तिरुअनंतपुरम येथे दाखल झाला आहे. भारतीय खेळाडूंनी मैदानावर केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट देऊन प्रार्थना केली.
हेही वाचा : IND vs NZ 4th T20I : भारतासाठी ठरतोय मिशेल सॅन्टनर खलनायक! 5 वेळा ब्लु जर्सीकडून हिसकावून घेतला विजय
न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या आणि पाचव्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी, भारतीय क्रिकेट संघातील किमान सात सदस्यांनी शुक्रवारी सकाळी जगप्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरात जाऊन प्रार्थना केली आहे. सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचे खेळाडू 29 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे दाखल झाले आणि शुक्रवारी सकाळी 9:15 च्या सुमारास मंदिराकडे रवाना झाले.
‘या’ खेळाडूंनी घेतले मंदिराचे दर्शन
पारंपारिक पोशाख परिधान केलेल्या भारतीय खेळाडूंनी टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव, अष्टपैलू अक्षर पटेल, फलंदाज रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती या खेळाडूंचा समावेश होता.तसेच, गोलंदाज कुलदीप यादव, रवी बिश्नोई आणि भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी देखील मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
पाचव्या टी-२० सामन्यापूर्वी विजयासाठी प्रार्थना करण्यासाठी संघातील सदस्य सुमारे ३० मिनिटे मंदिराच्या परिसरात उपस्थित होते. समृद्ध इतिहास लाभलेल्या भव्य अलंकृत वास्तुकलेसाठी प्रसिद्ध असलेले श्री पद्मनाभस्वामी मंदिर दक्षिण भारतातील सर्वात पवित्र आणि आदरणीय हिंदू तीर्थस्थळांपैकी एक मानले जाते.
संजू सॅमसन पहिल्यांदाच तिरुवनंतपुरममध्ये भारताकडून पहिलाच सामना
भारत आणि न्यूझीलंडमधील पाचवा आणि शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना शनिवारी तिरुवनंतपुरममध्ये खेळवण्यात येणार आहे. एक विशेष बाब म्हणजे भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन देखील केरळचा आहे. संजू सॅमसन विमानतळावर येताच चाहते जयघोष करू लागले. संजू सॅमसन त्याच्या घरच्या मैदानावर भारतीय संघाकडून खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
सूर्याकडून संजूला व्हीआयपी ट्रीटमेंट
विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू बस पकडण्यासाठी जात असताना सूर्यकुमार यादव हा यष्टीरक्षक संजू सॅमसनसोबत चालत होता. कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, “चेताला त्रास देऊ नका,” आणि सॅमसनकडे हात पुढे करत त्याला निघून जाण्याचा आग्रह देखील केला. तेव्हा सॅमसन हसत होता.






