Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांसमोर सालगडी मिळविण्याचे आव्हान; शेती बटाईने देण्याचे कल

यंदा गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर सालगडी मिळविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसाय अधिकच कठीण बनत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 20, 2026 | 12:56 PM
Farmer Loan Waiver, Maharashtra Government,

Farmer Loan Waiver, Maharashtra Government,

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांसमोर सालगडी मिळविण्याचे आव्हान
  • शेती बटाईने देण्याचे कल
  • खर्च वाढत असल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात
देहूगांव : गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा महाराष्ट्रातील प्रमुख सण असून शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस मानला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवशी शेतकऱ्यांकडून शेतात नवीन तास काढणे तसेच शेतीकामासाठी सालगडी ठेवण्याची परंपरा पाळली जाते. मात्र यंदा गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर सालगडी मिळविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

 

गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसाय अधिकच कठीण बनत असून, खरीप व रब्बी हंगामात पिके काढणीच्या वेळी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यातच मजुरांची कमतरता भासत असल्याने अनेक शेतकरी शेती बटाईने देण्याकडे वळत असल्याचे चित्र आहे. सध्या दीड लाख रुपये देण्याची तयारी दाखवूनही सालगडी म्हणून काम करण्यास कोणी तयार नसल्याचे वास्तव समोर येत आहे. दहा ते पंधरा एकर किंवा त्यापेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांना घरातील मनुष्यबळावर शेती करणे शक्य होत नसल्याने ते सालगडीवर अवलंबून असतात. मात्र बांधकाम, वीटभट्टी, ऊसतोडणी, तसेच हॉटेल उद्योगात अधिक मजुरी मिळत असल्याने ग्रामीण भागातील कामगार शहरांकडे वळत आहेत.

हे सुद्धा वाचा : महिलांचे शोषण करणारा अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? काँग्रेसचा सवाल

खर्च वाढत असल्याने शेतकरी दुहेरी कोंडीत

परिणामी शेती क्षेत्रात मजूर टंचाई तीव्र झाली आहे. शेतीतून मिळणारे उत्पन्न घटत असताना खर्च वाढत असल्याने शेतकरी दुहेरी कोंडीत सापडला आहे. अनेक ठिकाणी स्थानिक मजूर उपलब्ध नसल्याने इतर जिल्ह्यांतून मजूर आणण्याची वेळ येत आहे. रोजंदारी, ठेकेदारी तसेच ‘हातावर पैसा’ पद्धतीचा वापर वाढताना दिसत आहे.

“दरवर्षी शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. बी-बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरीचा खर्च वाढला असून उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळत नाही. प्रतिकूल हवामानामुळे उत्पन्न घटत असल्याने शेती परवडेनाशी झाली आहे. त्यामुळे अनेक जण जमीन बटाईने देणे पसंत करत आहेत.” – ज्ञानेश्वर बिरदवडे, सुधावडी (भंडारा डोंगर पायथा)

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये LPG चा तुटवडा? नागरिकांची अडचण; इंडक्शन स्टोव्हला वाढतेय मागणी

Web Title: Farmers are in trouble due to shortage of laborers to work in agriculture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • Farmers
  • Farmers News
  • Gudi Padwa 2026

संबंधित बातम्या

Wardha News : सोयाबीनचे पंचनामे रखडल्याने शेतकरी संतप्त; कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून निषेध
1

Wardha News : सोयाबीनचे पंचनामे रखडल्याने शेतकरी संतप्त; कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून निषेध

आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यातील 38 हजार 970 शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 345 कोटी…
2

आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यातील 38 हजार 970 शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 345 कोटी…

Animal Husbandry Committee Satara: पशुधनाचा विमा काढा अन् योजनांचा लाभ घ्या; वाघोलीत पशुपालकांची बैठक पार
3

Animal Husbandry Committee Satara: पशुधनाचा विमा काढा अन् योजनांचा लाभ घ्या; वाघोलीत पशुपालकांची बैठक पार

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आज किंवा उद्या खात्यात जमा होणार; बाबासाहेब पाटील यांची माहिती
4

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आज किंवा उद्या खात्यात जमा होणार; बाबासाहेब पाटील यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.