Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दौंडच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस; बळीराजा सुखवला! खरीप हंगामातील शेती कामांना वेग

गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळा आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अखेर निसर्गाने मोठा दिलासा दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 12, 2026 | 12:30 AM
मुसळधार पावसाचा देवगड तालुक्याला तडाखा; वादळी वाऱ्यामुळे कुणकेश्वर, मणचे, शिरवलीत घरांचे नुकसान

मुसळधार पावसाचा देवगड तालुक्याला तडाखा; वादळी वाऱ्यामुळे कुणकेश्वर, मणचे, शिरवलीत घरांचे नुकसान

Follow Us
Follow Us:

राजेगाव : गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळा आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अखेर निसर्गाने मोठा दिलासा दिला आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील मलठण, वाटलूज, नायगाव, राजेगाव, खानवटे, स्वामी चिंचोली आणि खडकी परिसरात वरुणराजाने दमदार एन्ट्री केली आहे. तब्बल तीन तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. या पहिल्याच मोठ्या आणि समाधानकारक पावसामुळे शेतकरी राजा कमालीचा आनंदी झाला असून, सुखावलेल्या बळीराजाने रखडलेल्या शेतीच्या कामांना आता जोमाने सुरुवात केली आहे.

 

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील राजेगाव आणि परिसरातील गावांमध्ये दुपारच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला. दुपारपर्यंत असलेल्या कडक उन्हानंतर अचानक ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पावसाचा जोर इतका वाढला की, सलग तीन तास पावसाने संपूर्ण परिसराला झोडपून काढले. या जोरदार पावसामुळे गावातील आणि परिसरातील ओढे, नाले ओसंडून वाहू लागले.

उभ्या पिकांना मिळाली नवसंजीवनी

हा पाऊस पूर्व भागातील कोरड्या पडत चाललेल्या शेतीसाठी अत्यंत अमृतमय ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत ग्रासला होता. वाढत्या उन्हामुळे उभ्या पिकांना पाण्याचा मोठा ताण जाणवू लागला होता, तसेच विहिरी आणि कूपनलिकांच्या (बोअरवेल) पाण्याच्या पातळीतही कमालीची घट झाली होती. परंतु, या तीन तासांच्या दमदार पावसाने पिकांना जणू नवसंजीवनी दिली आहे. उन्हाने करपू लागलेल्या ऊस, चारा पिके आणि इतर फळबागांना या पावसाचा मोठा आधार मिळाला असून पिके पुन्हा एकदा टवटवीत झाली आहेत.

खरीप पेरण्यांना येणार वेग; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

पावसामुळे जमिनीतील ओल वाढली असून, हवामान पिकांसाठी अत्यंत पोषक बनले आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, या पावसामुळे येत्या पुढील काही दिवसांत परिसरातील खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण होण्यास मोठी मदत होणार आहे. बहुतांश शेतकरी मशागतीची कामे आटोपून पावसाची चातकासारखी वाट पाहत होते.

हे सुद्धा वाचा : पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण धडक; पाच जण गंभीर जखमी

नागरिकांना उकाड्यापासून सुटका

या जोरदार पावसामुळे केवळ शेतीलाच फायदा झाला नाही, तर गेल्या अनेक दिवसांपासून असह्य उकाड्याचा सामना करणाऱ्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या आगमनाने वातावरणात छान गारवा निर्माण झाला असून निसर्गाचे रूपही बदलले आहे. एकंदरीत, दौंड तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या या दमदार पावसाने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. आता पुढील काळातही पाऊस असाच समाधानकारक राहावा, अशी प्रार्थना बळीराजा करत आहे.

Web Title: Farmers have expressed happiness due to the heavy rainfall in the eastern part of daund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • Rain News

संबंधित बातम्या

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार
1

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे
2

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे

Torrent Hydraulic Power Project: टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्टला ग्रामस्थांचा विरोध; आंबोटपाठोपाठ भालीवडीतही जागेची मोजणी रद्द
3

Torrent Hydraulic Power Project: टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्टला ग्रामस्थांचा विरोध; आंबोटपाठोपाठ भालीवडीतही जागेची मोजणी रद्द

Bhimashankar Temple: श्रावणानंतर भीमाशंकर परिसर चकाचक; भीमा नदीच्या उगमस्थळातून प्लास्टिक, गाळ अन् निर्माल्याची सफाई
4

Bhimashankar Temple: श्रावणानंतर भीमाशंकर परिसर चकाचक; भीमा नदीच्या उगमस्थळातून प्लास्टिक, गाळ अन् निर्माल्याची सफाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.