Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेडच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार, चिखलगाव परिसरात पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनाम्यांची मागणी

खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 03, 2026 | 12:37 PM
खेडच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार, चिखलगाव परिसरात पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनाम्यांची मागणी

खेडच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार, चिखलगाव परिसरात पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनाम्यांची मागणी

Follow Us
Follow Us:
  • खेडच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार
  • चिखलगाव परिसरात पिके जमीनदोस्त
  • शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनाम्यांची मागणी
चाकण : राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाने दमदार आगमन केले. कडक उन्हाळ्याने नागरिक त्रस्त झाले असतानाच त्यांना पावसाच्या हलक्या सरींनी गारवा अनुभवायला मिळाला. मात्र, अवकाळी आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातही गुरुवारी अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा संकटात सापडला असून, चिखलगाव परिसरात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

 

​पिके पाण्याखाली, शेतकरी हवालदिल

​पश्चिम भागातील चिखलगाव येथे पावसाचा जोर इतका होता की, काढणीला आलेला गहू, कांदा, मका आणि फरशी यांसारखी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने कापणी केलेला गहू भिजला असून कांदा सडण्याची भीती निर्माण झाली आहे. वर्षभर कष्ट करून पिकवलेले पीक डोळ्यादेखत मातीमोल होताना पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे.

​नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे यांचा पुढाकार

​नुकसानीची भीषणता लक्षात घेता, चिखलगावचे माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे यांनी तातडीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य समीरभाऊ सुपे यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. यावेळी समीर सुपे यांनी शेतकऱ्यांच्या या संकटकाळात खंबीरपणे पाठिशी राहण्याचे आश्वासन दिले.

​समीर सुपे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, “प्रशासनाच्या माध्यमातून या भागाचा तातडीने पाहणी दौरा आयोजित केला जाईल. महसूल विभागाच्या वतीने नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने पूर्ण करून, बाधीत शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहणार आहोत.”

हे सुद्धा वाचा : पावसाच्या तडाख्यानंतर प्रशासनाला जाग, नालेसफाईची कामे सुरू करणार; आयुक्तांची माहिती

​भरपाईची प्रतीक्षा

​नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिल्याने चिखलगाव परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. आता प्रशासनाने विलंब न लावता प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Web Title: Farmers have suffered huge losses due to unseasonal rains in khed taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Khed
  • Rain News

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
1

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
2

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
3

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
4

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.