Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! जुन्नर तालुक्यातील शेतकरी हवालदिल

जुन्नर तालुक्यासह आणे-माळशेज पट्ट्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत कांद्याचे भाव कमालीचे घसरले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 27, 2026 | 11:53 AM
Iran-Israel War : पुणे जिल्ह्यातील कृषी निर्यातीला फटका; केळी-कांदा निर्यात ठप्प, आता...

Iran-Israel War : पुणे जिल्ह्यातील कृषी निर्यातीला फटका; केळी-कांदा निर्यात ठप्प, आता...

Follow Us
Close
Follow Us:

ओतूर/मनोहर हिंगणे : जुन्नर तालुक्यासह आणे-माळशेज पट्ट्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत कांद्याचे भाव कमालीचे घसरले असून, शेतकऱ्यांना प्रति किलो केवळ १० ते १३ इतका अल्प दर मिळत आहे. या पडत्या दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले असून, जगाचा पोशिंदा पुन्हा एकदा चिंतेच्या गर्तेत सापडला आहे.

 

ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हान, पाचघर, उंब्रज, खामुंडी, डुंबरवाडी, धोलवड, उदापूर, डिंगोरे, पिंपळगाव जोगा यांसह परिसरातील अनेक गावांमध्ये कांदा हे मुख्य नगदी पीक घेतले जाते. या भागात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड झाली आहे. मात्र, सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढताच भाव कोसळल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

खर्च अवाढव्य, उत्पन्न नगण्य

कांदा लागवडीसाठी एकरी हजारो रुपये खर्च येतो. यामध्ये प्रामुख्याने बियाणे, खते, औषध फवारणी, मजुरी आणि वाहतुकीचा समावेश असतो. शेतकऱ्यांनी हा खर्च भागवण्यासाठी सोसायट्या कर्ज, सावकारी कर्ज, सोने तारण कर्ज किंवा बँक फायनान्सचा आधार घेतला आहे. मात्र, सध्याच्या भावातून मजुरी आणि वाहतुकीचा खर्च वजा जाता हाती काहीच उरत नसल्याने कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, हा प्रश्न उभा ठाकला आहे.

काय म्हणतात कांदा उत्पादक?

“रात्रंदिवस घाम गाळून पीक उभे केले, पण आता बाजारात विकायला नेल्यावर पदरात निराशाच पडत आहे. १० रुपयांत तर साधी मजुरीही निघत नाही. शासनाने कांदा उत्पादकांना वाऱ्यावर सोडले आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून आधार देण्याची गरज आहे.” अशी प्रतिक्रिया ओतूर परिसरातील शेतकरी सीताराम बापू डुंबरे यांनी दिली आहे.

“सध्या बाजारपेठेत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, मात्र त्या तुलनेत मागणी नसल्याने भावावर दबाव येत आहे. १० ते १३ रुपये किलो हा दर शेतकऱ्यांसाठी अत्यंत तोट्याचा आहे. खर्च आणि उत्पादनाचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निर्यातीबाबतचे धरसोडीचे धोरण आणि बाजारपेठेतील अस्थिरता यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.” असं कांदा व्यापारी व आडतदार प्रदीप शांताराम मुरादे यांनी सांगितले.

“बियाणे आणि खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यात निसर्गाची साथ मिळाली तरी बाजारात भाव मिळत नाही. १० ते १२ रुपये किलोने कांदा विकून पदरात काय पडणार? वाहतुकीचा खर्चही खिशातून द्यावा लागतोय. केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने सानुग्रह अनुदान जाहीर करावे.” – प्रमोद ढमाले (शेतकरी, ओतूर-रोहोकडी)

अर्थकारण प्रामुख्याने शेतीवर अवलंबून

जुन्नरच्या पश्चिम आणि पूर्व पट्ट्यातील अर्थकारण प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. कांद्याचे भाव पडल्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील बाजारपेठांवरही दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने व्यापाऱ्यांची उधारी आणि दैनंदिन आर्थिक उलाढाल पूर्णपणे थंडावली आहे. कांद्याच्या भावातील या घसरणीमुळे शेतकरी आता आक्रमक होत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी पुसणार का? की शेतकरी असाच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला राहणार? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे बाजार समितीत नव्याने टेंडर झोल; उपसभापती सहीशिवाय निविदा नाहीच

Web Title: Farmers in junnar taluka are worried due to the drop in onion prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Onion News
  • onion price

संबंधित बातम्या

कदमवाकवस्तीतील आमरण उपोषणाला यश; नुकसान भरपाईबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित
1

कदमवाकवस्तीतील आमरण उपोषणाला यश; नुकसान भरपाईबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित

केरोसीन वितरणाबाबत धोरणात्मक अस्पष्टता; पुणे ग्रामीणमधील वितरकांमध्ये संभ्रम
2

केरोसीन वितरणाबाबत धोरणात्मक अस्पष्टता; पुणे ग्रामीणमधील वितरकांमध्ये संभ्रम

देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा कारभारही झेपेना, जमत नसेल तर…; हर्षवर्धन सपकाळांची टीका
3

देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा कारभारही झेपेना, जमत नसेल तर…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

मुख्यमंत्री फडणविसांच्या हस्ते होणार चितळे बंधू मिठाईवाले यांच्या ‘रांजे व्हिजन पार्क’चे उद्घाटन
4

मुख्यमंत्री फडणविसांच्या हस्ते होणार चितळे बंधू मिठाईवाले यांच्या ‘रांजे व्हिजन पार्क’चे उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.