Ganesh Chaturthi 2026: पहिल्यांदाच घरच्या घरी गणपती बसवणार? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आजकाल बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या खूप मूर्ती मिळतात. दिसायला त्या सुंदर दिसतात मात्र त्या पर्यावरणाला हानी पोहोचवतात. शास्त्रानुसार पण शाडूच्या मातीची मूर्तीच शुभ मानली जाते. त्यामुळे यंदा शाडूचीच मूर्ती घरी आणा. मूर्ती घेताना अजून दोन गोष्टी बघा. बाप्पाची सोंड नेहमी डाव्या बाजूला असावी. उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा खूप कडक असते. डाव्या सोंडेचा गणपती प्रसन्न मानला जातो. आणि दुसरं म्हणजे मूर्ती बसलेली असावी, उभी नसावी. बसलेला गणपती स्थिरतेचं प्रतीक आहे. बाप्पा बरोबर त्याचा वाहन उंदीरमामा आहे का ते नक्की बघा.
हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. अनेक लोक मूर्ती आणल्यानंतर जागा बदलत राहतात. इकडून तिकडे करतात. असं चुकूनही करू नका. एकदा तुम्ही गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली की मूर्ती तिथून हलवायची नाही. थेट विसर्जनाच्या दिवशीच मूर्तीला हात लावायचा. त्यामुळे आधीच जागा नक्की करा आणि मगच मूर्ती ठेवा.
गणपती कुठे बसवायचा याला पण खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार बाप्पाला नेहमी पूर्व दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात बसवावे लागते. हा कोपरा सर्वात शुभ मानला जातो. सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्थापना केली तर शुभ मानले जाते. चुकूनही दक्षिण दिशेला किंवा नैऋत्य कोपऱ्यात गणपती बसवू नका. ती अशुभ दिशा मानली जाते.
तुम्ही दीड दिवस, 3 दिवस, 5 दिवस किंवा 10 दिवस गणपती ठेवत असाल, जितके दिवस बाप्पा घरी आहे तितके दिवस रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी लागते. आरती नाहीतर बाप्पाला नैवेद्य पण दाखवा. बाप्पाला मोदक आवडतो म्हणून नैवेद्य रोज गोडाचा असावा. ज्या घरात रोज आरती होते,तिथे बाप्पाची कृपा नेहमी राहते.
जितके दिवस गणपती घरी आहे तितके दिवस घर कधीच बंद ठेवू नका. घरात कोणीतरी असावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे बाप्पा बसवला आहे तिथे कधीच अंधार होऊ देऊ नका. तिथे नेहमी दिवा लावून ठेवा. रोषणाई करा. रोज त्या जागेची साफसफाई करा. तसेच या 10 दिवसात घरात मांसाहार, दारू असं तामसिक जेवण बनवू नका, खाऊ नका. घर पवित्र ठेवा.
बाप्पाला बाजारातून घरी आणताना खूप काळजी घ्या. मूर्तीला कुठेही धक्का लागणार नाही, तडा जाणार नाही याची काळजी घ्या. तडा गेलेली मूर्ती पूजेत ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे मूर्ती आणताना व्यवस्थित पॅक करून आणा. घरी आणल्यावर पण लहान मुलांना मूर्तीपासून लांब ठेवा जेणेकरून ती पडणार नाही.तर मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत. यंदा बाप्पा घरी येतोय तर त्याचं स्वागत असं करा की त्याची कृपा वर्षभर तुमच्यावर राहील. गणपती बाप्पा मोरया!
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






