Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोर तालुक्यात कुटुंबे उघड्यावर; गारपीठ अन् वादळी पावसामुळे शेतीसह घरांचे अतोनात नुकसान

भोर शहरासह ग्रामीण भागात सोमवारी झालेल्या अवकाळी गारपीठ आणि वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 01, 2026 | 12:30 AM
भोर तालुक्यात कुटुंबे उघड्यावर; गारपीठ अन् वादळी पावसामुळे शेतीसह घरांचे अतोनात नुकसान

भोर तालुक्यात कुटुंबे उघड्यावर; गारपीठ अन् वादळी पावसामुळे शेतीसह घरांचे अतोनात नुकसान

Follow Us
Follow Us:
  • भोर तालुक्यात कुटुंबे उघड्यावर
  • गारपीठ अन् वादळी पावसामुळे मोठं नुकसान
  • संसारोपयोगी वस्तू पावसात भिजल्या
भोर : भोर शहरासह ग्रामीण भागात सोमवारी झालेल्या अवकाळी गारपीठ आणि वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांचे छप्पर उडाल्याने सामान्य नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. भर पावसात आणि गारपिठीने काढणीला आलेल्या गहू, कांदा, ज्वारी, यासारख्या रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आंबा बागांनाही या अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितांची जुळवाजुळव कोलमडली आहे. तर जनावरांसाठी साठवलेला चारा भिजल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

यात्रेनिमित्त उभारलेला मांडव उडून गेला

वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने व खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला. महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील वडगाव डाळ येथे ग्रामदेवता यात्रेनिमित्त उभारलेला मांडव उडून गेला. उज्वला विजय चव्हाण यांच्या घराचे छप्पर उडून सुरेश यदु गायकवाड यांच्या घरावर पडल्याने त्यांच्याही घराचे नुकसान झाले. त्यात ते जखमी झाले आहेत. इतर गावांत देखील घरांची पडझड झालेल्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.

संसारोपयोगी वस्तू पावसात भिजल्या

अचानक ओढवलेल्या या संकटामुळे अनेकांचे धान्य, कपडे आणि संसारोपयोगी वस्तू पावसात भिजून खराब झाल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी शासनाकडे मदतीची आर्त हाक दिली आहे. “आम्ही जगायचे कसे?”असा प्रश्न पीडित कुटुंबे उपस्थित करत आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आणि नुकसानग्रस्तांना तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

हे सुद्धा वाचा : सिलेक्टिव्ह व्हिडिओ लिक करण्यामागे गृहविभागाचा कुटील डाव; खरात प्रकरणावरुन काँग्रेसचा आरोप

Web Title: Hailstorms and heavy rains have caused extensive damage to many houses and farms in bhor taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Rain News

संबंधित बातम्या

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता
1

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
2

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
3

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
4

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.