Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा लवकरच होणार सुरू; वाहतूक कोंडीचा प्रश्नही मिटणार

‘माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी)’ या टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी तात्पुरते प्राधिकरण प्रदान केले आहे. त्यामुळे या मार्गावर प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 28, 2026 | 09:43 AM
मोठी बातमी ! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा लवकरच होणार सुरू; वाहतूक कोंडीचा प्रश्नही मिटणार

मोठी बातमी ! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा लवकरच होणार सुरू; वाहतूक कोंडीचा प्रश्नही मिटणार

Follow Us
Follow Us:

पुणे : हिंजवडी आयटी पार्कला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या ‘पुणे मेट्रो मार्गिका-३’ (हिंजवडी ते शिवाजीनगर) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील पहिल्या टप्प्यासाठी महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. आता हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा लवकरच सुरु होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे मेट्रो मार्गिका-३ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मिळालेली सुरक्षा आयुक्तांची मंजुरी ही पुणेकरांसाठी आणि पीएमआरडीएसाठी अत्यंत समाधानकारक बाब आहे.

‘माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी)’ या टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी तात्पुरते प्राधिकरण प्रदान केले आहे. त्यामुळे या मार्गावर प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयांतर्गत कार्यरत मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी) या १२ स्थानकांदरम्यानच्या टप्प्यावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यास अखेर मंजुरी दिली आहे. यामुळे ही सेवा आता लवकरच सुरू होणार आहे.

आयटी पार्कची वाहतूक कोंडी फुटणार ! पुणे मेट्रो मार्गिका-3 च्या ‘माण ते बालेवाडी’ टप्प्याला सुरक्षा मंजुरी

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित, वेगवान तसेच पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे. या मंजुरीमुळे प्रकल्पाने एक मोठा आणि निर्णायक टप्पा गाठला असून, उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ही प्रवासी सेवा लवकरात लवकर नागरिकांसाठी सुरू करण्यासाठी पीएमआरडीए प्रशासन कटिबद्ध आहे, असे पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

12 स्थानकांचा समावेश

सुमारे १३ किलोमीटर लांबीच्या या दुहेरी मार्गावर एकूण १२ स्थानके समाविष्ट आहेत. ही मेट्रो प्रणाली ७५० व्होल्ट डीसी थर्ड रेल ट्रॅक्शन आणि सीबीटीसी सिग्नलिंगवर आधारित आहे. सुरक्षा मंजुरी मिळाल्यामुळे आता या मार्गावर ‘एटीपी’ मोडअंतर्गत ताशी ८० किलोमीटरच्या कमाल वेगाने मेट्रो धावू शकणार आहे.

आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास होईल मदत

“या मंजुरीमुळे आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल. नागरिकांना वेगवान आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी पीएमआरडीए प्रशासन उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण करेल.”

– डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

Pimpri-Nigdi Metro विस्ताराला मोठा वेग ! अखेर चौथ्या स्थानकाला मंजुरी; महापालिकेकडून २५ कोटींची तरतूद

Web Title: Hinjawadi shivajinagar metro service to start soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • Hinjewadi-Shivajinagar Metro
  • metro 3
  • pune news

संबंधित बातम्या

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड
1

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’
2

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे
3

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई
4

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.