एकवीरा आई कार्ला किल्ल्यावरील भाविकांवर मधमाशांचा हल्ला झाला आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
कार्ला : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रावर मोठी गर्दी झाली होती. कार्ला येथील वेहरगाव एकवीरा गडावर नववर्षारंभाच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. एकवीरा आईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, काही भाविकांच्या खोटसाळपणामुळे अनेक भाविकांना त्रास सहन करावा लागला आहे. काही अतिउत्साही भाविकांनी मंदिराच्या आवारामध्ये मनाई असतानाही मंदिराजवळ रंगीत धुराचे फटाके फोडले. या रंगीत धुराच्या फटाक्यांमुळे मधमाशांच्या पोळ्यांना इजा पोहोचल्याने मधमाशांनी संतप्त होऊन भाविकांवर हल्ला केला. एकवीरा आईच्या मंदिराबाहेर भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला असून याचा व्हिडिए देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लोणावळ्यातील एकवीरा गडावर नववर्षानिमित्त देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी कार्ला गडावर गर्दी केली होती. यावेळी देवीची पालखी देखील काढण्यात आली. दरम्यान, काही हुल्लडबाज भाविकांनी फटाके फोडल्याने देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसेच काही भाविक जखमी झाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गडावर एकच गोंधळ उडाला, आणि अनेक भाविकांना मधमाश्यांनी चावा घेतला. अचानक झालेल्या या हल्ल्यामध्ये घेतल्याने ते जखमी झाले. यात चेंगराचेंगरी झाल्याने 20 ते 25 भाविक जखमी झाले. या सर्व भाविकांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मधमाशींचा हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या भाविकांना तातडीने एकविरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. मधमाशी हलल्यामध्ये जखमी झालेल्या भाविकांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी घेऊन आलेल्या भाविकांपैकी काहींनी हे फटाके वाजवले, ज्यामुळे इतर भाविकांनाही त्रास सहन करावा लागला. या आधीपासूनच एकविरा गडावर फटाके वाजविण्यास बंदी आहे, परंतु तरीही काही भाविक या नियमांकडे दुर्लक्ष करतात.या घटनेनंतर ग्रामस्थांनी गडावरील फटाक्यांवरची बंदी अधिक कडक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. कार्ला येथील ग्रामस्थ अशोक कुटे यांनी याबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे.
व्हायरल न्यूज वाचण्यासाठी येथे क्लिक करा
याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी देखील या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच उपद्रवी काही भाविकांमुळे इतर भाविकांना देखील त्रास झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी जखमी भाविकांची विचारपूस केली आहे. तसेच फटाके वाजवण्याबाबत पूर्ण बंदी असावी अशी देखील मागणी केली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नागरिक जीव वाचवून पळत असलेले दिसत आहे. तर काही भाविक खाली वाकून मधमाशांच्या हल्ल्या पासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. तर महिला भाविकांनी डोक्यावर पदर घेतले आहेत.