चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून
कांदळी, नगदवाडी (ता.जुन्नर) येथील शिंदे मळा याठिकाणी चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असल्याची माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
नारायणगाव : कांदळी, नगदवाडी (ता.जुन्नर) येथील शिंदे मळा याठिकाणी चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून खून (Murder in Narayangaon) केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असल्याची माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
संध्या सुरेश शिंदे (वय ५१) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सुरेश दगडू शिंदे (वय ५९ रा शिंदे मळा नगदवाडी, कांदळी) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून, याबाबतची फिर्याद आरोपीचा मुलगा सुशांत सुरेश शिंदे (वय ३१ वर्षे रा शिंदे मळा नगदवाडी कांदळी) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश याला पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशय होता व यावरून दोघांमध्ये अनेकवेळा भांडणे होत होती.
२ जानेवारी रोजी रात्री १२.३० च्या सुमारास पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली. आरोपी सुरेश यांनी मद्यप्राशन केले होते व त्यात त्याने चारित्र्याचा संशयाचा राग मनात धरून पत्नी संध्या चा हाताने गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर आरोपी सुरेश नारायणगाव येथे येऊन एका ठिकाणी बसला होता. पोलिसांनी त्याचा तपास लावून ताब्यात घेतले व माहिती घेतली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सानील धनवे करीत आहे.
Web Title: Husband murder his wife in narayangaon pune nrka