पुण्याला मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- ai gemini)
पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पुण्यात पावसाचा जोर वाढणार आहे. घाटमाथा परिसरात हवामान विभागाने मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे लवकरच पुणेकरांना पाणीकपातीपासून सुटका मिळण्याचा अंदाज आहे.
पुणे शहरात सध्या एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात देखील पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पानशेत, वरसगांव आणि टेमघर धरणांचा समावेश होतो. या क्षेत्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली असण्याची शक्यता आहे.
Mumbai Rain Updates: मुंबई पावसाचा जोर कायम! तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने; सखल भागांत पाणीच पाणी
पुणे शहरात आणि उपनगरात पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे. अनेक सखल भागात पाणी सचल्याच्या किरकोळ घटना घडल्याचे समोर येत आहे. खडकवासला धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने पुढील 2 ते 3 दिवस पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाचा परिणाम पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर देखील झाल्याचे पहायला मिळाले.
विदर्भात दमदार पाऊस; बळीराजा सुखावला, वर्ध्यात 18 मंडळांत अतिवृष्टी
मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. आज, गुरुवारी देखील मुंबईत पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवलीसह अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे. तसेच नवी मुंबईत देखील पावसाची बॅटिंग सुरु आहे. याशिवाय, वाढत्या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक उशीराने सुरु आहे. तसेच, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने आणि पावसामुळे दृष्टमानता कमी झाल्याने रस्ते वाहतूक देखील मंदावली आहे.






