कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता.शिरूर) व दरेकरवाडी पाणंद/शिव रस्त्याची प्रांत अधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी पाहणी केली असून, लवकरच क्षेत्राची मोजणी आणि हद्द कायम करण्यात येऊन रस्ता निश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
यावेळी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, उपसरपंच सागर दरेकर, माजी उपसरपंच ॲड. विजयराज दरेकर, उद्योजक नवनाथ दरेकर, राजेश भुजबळ, नवनाथ हरगुडे, मंडल अधिकारी विकास फुके, तलाठी गोविंद घोडके, ग्रामसेवक बाळनाथ पवणे, कोतवाल गजानन दरेकर, दगडू दरेकर, अनिल दरेकर, अशोक दरेकर व शेतकरी बांधव उपस्थित होते.
शिवरस्ता/पाणंद रस्ता यासाठी पिढ्यानपिढ्या वाद सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. पण न भांडता, वादविवाद न घालता सर्वांना एकत्र करत चर्चा विनिमय करत पाणंद रस्ता/शिवरस्टा खुला करण्याचा अभिनव प्रयत्न सणसवाडीच्या सरपंच सुनंदा दरेकर करत असून, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे.
याबाबत ग्रामस्थांनी सरपंच सुनंदा दरेकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर सरपंच दरेकर यांनी आमदार अशोक पवार यांना या समस्येबाबत कळवले. आमदार पवार यांनी तातडीने प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याशी याबाबत संपर्क साधत तातडीने लक्ष देण्याची सूचना केली होती. स्वतः प्रांत अधिकारी देशमुख यांनी संवाद साधत शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान पाहायला मिळाले.
रस्त्याच्या अडचणीमुळे शेतकऱ्याला शेतमाल बाजारपेठेत न्यायला त्रास होतो. आम्हाला आमचा बळीराजा सुखी करायचा आहे. त्यासाठी रस्ते खुले झाले पाहिजे.
– सुनंदा दरेकर, सरपंच.