Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साड्या वाटून आणि लोकांना देवदर्शन करून तालुक्याचा विकास करणार का?; ललिता कटकेंचा विरोधकांना सवाल

वाड्या वस्त्यांवर गाडी सुद्धा जाऊ शकत नाहीत, कचऱ्याची मोठी समस्या आहे, विद्युत व्यवस्था अद्यापही अनेक ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यास यापूर्वीच्या लोकांना अपयश आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 03, 2026 | 09:15 AM
साड्या वाटून आणि लोकांना देवदर्शन करून तालुक्याचा विकास करणार का?

साड्या वाटून आणि लोकांना देवदर्शन करून तालुक्याचा विकास करणार का?

Follow Us
Follow Us:

सासवड : पुरंदर तालुक्यात रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली आहे, लोकांना रस्त्यावरून वाहने चालवता येईनात. त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळणे गरजेचे आहे, त्याबाबत कोणी बोलत नाही. मात्र, निवडणुका आल्या की, महिलांना साड्या वाटप करणे, लोकांना देवदर्शन घडवून आणून मतांचे प्रलोभन दाखवले जात आहे. त्यामुळे एकीकडे विकासकामांकडे दुर्लक्ष करायचे आणि निवडणुकीच्या काळात साड्या वाटून तालुक्याचा विकास करणार का? असा जाहीर सवाल गराडे गणातील भाजपच्या उमेदवार ललिता दिलीप कटके यांनी विरोधकांना केला आहे.

ललिता कटके यांनी जिल्हा परिषदेच्या उमेदवार दिव्या जगदाळे यांच्यासह दिवे गराडे गटातील विविध गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मतदारांनी त्यांच्याकडे वर्षानुवर्षे कोणतीच कामे झाली नसल्याची खंत व्यक्त करून अनेक समस्या मांडल्या आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तुम्हाला महिलांना साड्या वाटायच्या असतील तर दिवाळीत भाऊबीजेला का वाटत नाही ? असाही उपरोधिक टोला हाणला आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Budget 2026 : झालं क्लिअर ! देवेंद्र फडणवीस मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

वाड्या वस्त्यांवर गाडी सुद्धा जाऊ शकत नाहीत, कचऱ्याची मोठी समस्या आहे, विद्युत व्यवस्था अद्यापही अनेक ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यास यापूर्वीच्या लोकांना अपयश आले आहे. आमच्याच गावातील उमेदवार म्हणून निवडून दिले. मात्र, त्यांनी दशक्रिया विधी आणि लग्नसोहळा व्यतिरिक्त कोठेही दिसून आले नाहीत, अशा शब्दांत कोणाचेही नाव न घेता जोरदार टोला लगावला.

तरुणांनी शिक्षण घेतले मात्र रोजगाराची सुविधा नाही, त्यांना रोजगार मिळण्यासाठी या परिसरात विविध कंपन्या आल्यास अनेक तरुणांचा रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आपल्या भागात कंपन्या येण्या साठी प्रयत्न करणार असल्याचे ललिता कटके यांनी सांगितले आहे.

बचत गटातील महिला तसेच कित्येक सामान्य महिलांना अजूनही पुरेसे रेशनचे धान्य मिळत नाही, एखाद्या महिन्यात न्यायला उशीर झाल्यास धान्य संपल्याचे सांगितले जाते, मग नागरिकांचे धान्य कोठे जाते? असा प्रश्न उपस्थित करून महिलांना त्यांच्या हक्काचे धान्य नियमित मिळावे आणि त्यांना न्याय देण्यासाठी लढा देणार आहे असे ठणकावून सांगितले.

दरम्यान, ललिता कटके यांनी गराडे गणातील हिवरे, चांबळी, बोपगाव, भिवरी, गराडे आदी गावातील शेतकरी तसेच महिलांशी थेट शेतात जावून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी महिलांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. सध्या शेतात गुलाबाच्या फुलांची तोडणी, कांदे काढणी अशी शेतातील कामे सुरु असून, मतदारांना थेट शेतात जावून त्यांच्या भेटीगाठीचा सिलसिला सुरु केला आहे. अशा वेळी गावागावातील महिलांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे.

आमच्या भावना जाणून घेणाऱ्या उमेदवार आहेत, अशा शब्दात कौतुक केले जात असल्याचे दिसून येत आहे. आमच्या घरात कोणताही राजकीय वारसा नाही. मात्र, सामान्य लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे, आणि त्यांना योग्य न्याय देण्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात येत असल्याचे कटके यांनी सांगितले.

Web Title: Lalita katke criticized on opposition know what she said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • political news
  • Purandar News
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Aditya Thackeray: पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांवर आदित्य ठाकरे कडाडले; म्हणाले, ‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन्…’
1

Aditya Thackeray: पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांवर आदित्य ठाकरे कडाडले; म्हणाले, ‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन्…’

‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन…’, खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून जाहीर माफी
2

‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन…’, खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून जाहीर माफी

Maharashtra Politics : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही वाढले भाजपचे संख्याबळ; विधिमंडळात नाही आता मित्रपक्षांची गरज?
3

Maharashtra Politics : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही वाढले भाजपचे संख्याबळ; विधिमंडळात नाही आता मित्रपक्षांची गरज?

महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र राज्य देशात दुसरे; खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली विधानसभेत कबुली
4

महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र राज्य देशात दुसरे; खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली विधानसभेत कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.