Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग; अर्थ किंवा महसूल खात्यासाठी वळसे पाटील यांचे नाव चर्चेत

राज्यातील महायुती सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा वेग आला असून, त्यानिमित्ताने विविध खात्यांच्या वाटपाबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 30, 2026 | 12:06 PM
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग; अर्थ किंवा महसूल खात्यासाठी वळसे पाटील यांचे नाव चर्चेत

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग; अर्थ किंवा महसूल खात्यासाठी वळसे पाटील यांचे नाव चर्चेत

Follow Us
Follow Us:

रांजणी /रमेश जाधव : राज्यातील महायुती सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा वेग आला असून, त्यानिमित्ताने विविध खात्यांच्या वाटपाबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थ किंवा महसूल यापैकी महत्त्वाचे खाते मिळाल्यास त्या खात्याची धुरा कोणाच्या हाती दिली जाणार, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

 

राजकीय निरीक्षकांच्या मते, राज्याचे उपमुख्यमंत्री( स्व) अजित दादा पवार यांच्याकडे असलेले अर्थ खाते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. अर्थसंकल्पीय प्रक्रिया आणि प्रशासकीय कारणांमुळे हे खाते तात्पुरत्या स्वरूपात मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आगामी काळात खातेवाटपाच्या फेरबदलात अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता काही जाणकार व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून पक्षाला महत्त्वाचे खाते मिळावे यासाठी विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, खासदार पार्थ पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्यास त्या खात्यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून चर्चेत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव, विविध खात्यांमधील कामकाजाची सखोल जाण, तसेच महायुतीतील घटक पक्षांशी असलेला समन्वय यामुळे ते या जबाबदारीसाठी योग्य ठरू शकतात, असे मत काही जाणकार व्यक्त करीत आहेत.

राजकीय कारकिर्दीत दिलीप वळसे पाटील यांनी उच्च तंत्र शिक्षण, ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, अर्थ,कामगार, उत्पादन शुल्क, सहकार, गृह तसेच विधानसभा अध्यक्ष यांसारख्या विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. विशेषतः राज्यात वीजटंचाईचे संकट असताना ऊर्जा खात्याची धुरा सांभाळत त्यांनी घेतलेल्या निर्णयांची आजही राजकीय क्षेत्रात चर्चा होत असल्याचे निरीक्षक सांगतात.

सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांशी सलोख्याचे संबंध, अभ्यासू वृत्ती, पारदर्शक कार्यपद्धती आणि प्रशासकीय अनुभव ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ किंवा महसूल यापैकी कोणतेही महत्त्वाचे खाते मिळाल्यास त्याची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपविली जाऊ शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आणि विधिमंडळ सदस्यांमध्ये सुरू असल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा : विधान परिषदेच्या 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत, काँग्रेसला 8 अन्…; हर्षवर्धन सपकाळांची माहिती

दरम्यान विश्वसनी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थ खात्याऐवजी महसूल खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्याच्या हालचाली भाजपच्या गोटात सुरू आहेत. जर तसे झाल्यास चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा ऊर्जा खाते मिळू शकते कारण यापूर्वी बावनकुळे यांनी ऊर्जा खात्याचा कारभार योग्य पद्धतीने हाताळला असून, त्यांना ऊर्जा खात्याचा चांगला अनुभव आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि मंत्रिपदांची जबाबदारी याबाबतचा अंतिम निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेतृत्व घेणार असून अधिकृत घोषणा होईपर्यंत या सर्व चर्चा केवळ राजकीय शक्यता आणि अंदाज म्हणूनच पाहिल्या जात आहेत.

Web Title: Ncps dilip walse patil is likely to get the post of finance minister or revenue minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • Dilip Walase Patil
  • NCP News
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

कोण होणार ‘सोमेश्वर’चा चेअरमन? ‘ही’ नावे चर्चेत; सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष
1

कोण होणार ‘सोमेश्वर’चा चेअरमन? ‘ही’ नावे चर्चेत; सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष

Beed News : बीडमध्ये दुष्काळाचे संकट गडद; २२५ टँकर्स सुरू, सुनेत्रा पवारांनी दिले महत्त्वाचे निर्देश
2

Beed News : बीडमध्ये दुष्काळाचे संकट गडद; २२५ टँकर्स सुरू, सुनेत्रा पवारांनी दिले महत्त्वाचे निर्देश

Rohit Pawar : ‘सुनेत्रा पवारांना अर्थमंत्रिपद मिळणार नाही’, रोहित पवारांच्या विधानाने राजकारणात खळबळ
3

Rohit Pawar : ‘सुनेत्रा पवारांना अर्थमंत्रिपद मिळणार नाही’, रोहित पवारांच्या विधानाने राजकारणात खळबळ

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर
4

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.