पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी(फोटो-सोशल मीडिया)
Mohsin Naqvi ignored the ICC’s warning : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना होणार नसल्याची शक्यता बळावली आहे. पाकिस्तान सरकारकडून १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या भारताविरुद्धच्या गट अ सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकारने रविवारी, १ फेब्रुवारी रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स द्वारे या निर्णयाची अधिकृत घोषणा केली होती.
हेही वाचा : IND19 vs PAK19: सरफराज अहमदकडून चालू सामन्यात चिटिंग! डगआउटमध्ये बसुन खुलेआम वापरला फोन; पडली वादाची ठिणगी
सरकारच्या निर्णयानंतर एका दिवसानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डमधील एका विश्वसनीय सूत्राकडून स्पष्ट करण्यात आली की बोर्डाकडे सरकारच्या निर्देशांचे पालन करण्याशिवाय काही एक पर्याय नाही. एका वृत्ताच्या सूत्राने सांगितले की, टी-२० विश्वचषक २०२६ च्या नॉकआउट टप्प्यात भारताविरुद्धचा सामना आला तरी पीसीबी सरकारच्या निर्णयानुसार पुढे जाणार आहे.
सूत्रांनी सांगितले की, “सरकारकडून बोर्डाला स्पष्टपणे कळवण्यात आले आहे की, राष्ट्रीय संघ १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध खेळणार नाही आणि विश्वचषकात त्या सामन्यातील गुण गमवावे लागतील. मंडळ नॉकआउट टप्प्यातही सरकारच्या सूचनांचे पालन करेल.” पीसीबी सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) सरकारच्या निर्णयाची औपचारिक माहिती देणार आहे. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले होते की आयसीसीच्या कोणत्याही प्रतिसादाला न जुमानता बोर्ड सरकारच्या बाजूने उभे राहणार आहे.
अलिकडच्या काळात आयसीसीकडून काही क्रिकेट बोर्डांशी निष्पक्ष वागणूक देण्यात येत नाही.अशी पीसीबीचे मत पक्के होताना दिसत आहे. विशेषतः बांगलादेशच्या घटनेचा उल्लेख करून, सूत्रांनी सांगितले की, “एकाच बोर्डाला जागतिक क्रिकेट चालवण्याचे स्वातंत्र्य देता येणार नाही.”
विश्वचषकाच्या महसुलावर परिणाम होईल
दरम्यान, रविवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात, आयसीसीने म्हटले आहे की, सर्व संबंधित पक्षांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पीसीबीसोबत परस्पर सहमतीने तोडगा काढण्यात येण्याची आशा आहे. जर पाकिस्तान आपल्या निर्णयावर कायम राहिला तर त्याचा टी-२० विश्वचषकातून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होणीयकी शक्यता आहे. असे आयसीसीकडून इशारा देण्यात आला आहे.






