Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Toxic Liquor Case: पुण्यातील उत्पादन शुल्क कार्यालयाला टाळे लावण्याचा युवक कॉंग्रेसचा प्रयत्न!

पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 31, 2026 | 08:48 PM
Pune Toxic Liquor Case Congress protest against Excise duty office at Pune, Pune Toxic Liquor Case, Congress protest against Excise duty office at Pune,

Pune Toxic Liquor Case Congress protest against Excise duty office at Pune, Pune Toxic Liquor Case, Congress protest against Excise duty office at Pune,

Follow Us
Close
Follow Us:
  • काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन
  • पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ कार्यालयाला टाळे लावण्याचा प्रयत्न
  • दोषींवर कठोर कारवाई व जबाबदार अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात केमिकलयुक्त विषारी गावठी दारू प्यायल्याने तब्बल २२ जणांचा मृत्यू झाल्याची धक्काफायक बातमीमुळे संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. हडपसर येथील काळेपडळ येथे तयार झालेल्या या ‘विषारी दारूमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले असून या घटनेमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या भीषण दुर्घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले.

पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले. कार्यालयाला टाळे लावण्याचा प्रयत्न ही करण्यात आला. आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे अखेर पोलिसांच्या मध्यस्थीत युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक श्री. अतुल कानडे यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई व जबाबदार अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करणारे निवेदन सादर केले.

यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढले. शहरात सर्रास सुरू असणाऱ्या अवैध व भेसळयुक्त दारूविक्रीकडे विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच, पोर्शे कार अपघाताचा संदर्भ देत क्लबमधील बेकायदेशीर व्यवहारांना पोलिसांपेक्षा उत्पादन शुल्क विभागच जास्त जबाबदार असल्याचे सांगत, यावर कारवाई न झाल्यास या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी युवक काँग्रेस लवकरच ‘स्टिंग ऑपरेशन’ करेल असा इशारा देण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, पुणे शहर प्रभारी गणेश उबाळे, शहराध्यक्ष सौरभ अमराळे, प्रदेश सरचिटणीस भूषण रानभरे, महेश म्हेत्रे, प्रदेश सचिव विश्वजीत जाधव, अभिषेक अवचर, अथर्व सोनार, निखिल मलके, विकास सुपनार, विवेक कडू यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला, शिवसेना आमदारांनी युतीधर्म पाळावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी

देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका करताना काँग्रेसने आपल्या ‘X’ अकाउंटवरून पोस्ट करत सांगितले की, “या भीषण दुर्घटनेची थेट आणि नैतिक जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांवरच आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ राजकीय डावपेच आखण्यात आणि आपली खुर्ची टिकवून ठेवण्यातच मग्न आहेत; परिणामी, गृहविभागावरील त्यांची पकड पूर्णपणे ढिली झाली आहे. ज्या व्यक्तीने एकेकाळी गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याबाबत पोकळ दावे केले होते, त्याच व्यक्तीचा प्रशासनावर आता ना कोणताही वचक राहिला आहे, ना दरारा. काँग्रेसने अशी भूमिका मांडली की, या निष्पाप लोकांच्या मृत्यूची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली पाहिजे आणि गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. कारण, जनतेच्या जीविताचे रक्षण करण्यास असमर्थ असलेल्या कोणत्याही व्यक्तीला, गृहमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही.”

अनिकेत तटकरेंना विधान परिषदेची लॉटरी, अदिती तटकरेंसह उमेदवारी अर्ज भरण्यास रवाना

Web Title: Pune toxic liquor case congress protest against excise duty office at pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • Congress
  • pune news

संबंधित बातम्या

कल्पनाशक्तीला ‘एआय’चे पंख, AI मुळे चित्रकलेच्या विश्वात बदल; डिजिटल आर्टचा वाढता प्रभाव
1

कल्पनाशक्तीला ‘एआय’चे पंख, AI मुळे चित्रकलेच्या विश्वात बदल; डिजिटल आर्टचा वाढता प्रभाव

Pune Toxic Liquor Tragedy: २२ जणांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे आक्रमक; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला घेरले
2

Pune Toxic Liquor Tragedy: २२ जणांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे आक्रमक; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला घेरले

बापरे! तब्बल 1413 कोटींची संपत्ती! DK Shivakumar देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री; तर सर्वात कमी संपत्ती कोणत्या CM कडे?
3

बापरे! तब्बल 1413 कोटींची संपत्ती! DK Shivakumar देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री; तर सर्वात कमी संपत्ती कोणत्या CM कडे?

‘पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त करणार’; गिरीश महाजनांचं मोठं विधान
4

‘पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त करणार’; गिरीश महाजनांचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.