Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हॉटस्पॉट’! काँक्रीटच्या जंगलात हरवला ‘गारवा’; उष्णतेच्या लाटेत होरपळतेय ‘आपलं पुणे

हवामान विभाग दररोज हवेतील तापमानाची नोंद करतो; मात्र जमिनीवरील तापमान त्यापेक्षा अधिक असते. पुण्यात उन्हाळ्यात भूपृष्ठाचे तापमान हवेच्या तापमानापेक्षा चार ते आठ अंशांनी जास्त नोंदवले जाते.

  • By तेजस भागवत
Updated On: May 12, 2026 | 02:35 AM
‘हॉटस्पॉट’! काँक्रीटच्या जंगलात हरवला ‘गारवा’; उष्णतेच्या लाटेत होरपळतेय ‘आपलं पुणे
Follow Us
Follow Us:

पुण्याची वाटचाल हळूहळू ‘तप्त शहरा’कडे
पुण्यातील भूपृष्ठाचे तापमान पोहोचले धोकादायक पातळीवर
सर्वाधिक तापमानवाढ अनुभवणाऱ्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश

सुनयना सोनवणे /पुणे: दिवसाच्या कडक उन्हानंतर रात्री गारवा अनुभवणारे पुणे आता हळूहळू ‘तप्त शहरा’कडे वाटचाल करत असल्याचे चित्र समोर येत आहे. शहरातील वाढते काँक्रीटीकरण, कमी होत (Sun Heat) चाललेल्या मोकळ्या जागा, भूगर्भातील बेसुमार जलउपसा आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे पुण्यातील भूपृष्ठाचे तापमान धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. उन्हाळ्यात शहरातील भूपृष्ठाचे तापमान सरासरी ४९ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जात असून, उष्णतेच्या लाटेदरम्यान काही भागांत ते ५० ते ५५ अंशांपर्यंत पोहोचत असल्याचे हवामान अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या दीर्घकालीन नोंदी आणि विविध स्थानिक हवामान अभ्यास अहवालांनुसार, गेल्या ५० वर्षांत पुण्याच्या वार्षिक सरासरी तापमानात १ ते १.२ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. देशातील सर्वाधिक तापमानवाढ अनुभवणाऱ्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश होत असल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

हवामान विभाग दररोज हवेतील तापमानाची नोंद करतो; मात्र जमिनीवरील तापमान त्यापेक्षा अधिक असते. पुण्यात उन्हाळ्यात भूपृष्ठाचे तापमान हवेच्या तापमानापेक्षा चार ते आठ अंशांनी जास्त नोंदवले जाते. डांबरी रस्ते, काँक्रीटची बांधकामे आणि काचेच्या इमारती सूर्याची उष्णता शोषून घेत असल्याने रात्रीही जमीन सहज थंड होत नाही. त्यामुळे शहरातील अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत उष्णतेची झळ जाणवत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. ज्येष्ठ भूगोल अभ्यासक श्रीकांत कार्लेकर यांच्या मते, वाढते प्रदूषण, उंच इमारती आणि हरित क्षेत्रांची घट यामुळे शहरातील उष्णतेचा समतोल बिघडत आहे. परिणामी दिवसाबरोबरच रात्रीचे तापमानही वाढत असून, नागरिकांमध्ये अस्वस्थता, झोपेचा त्रास आणि उष्माघाताच्या तक्रारी वाढत आहेत.

पुण्याच्या तापमानात मोठी वाढ; तापमानाचा पारा 38 अंशांवर, ढगांची चाहूल तरीही उकडा कायम

सर्वाधिक तापमान असलेले भाग-
लोहगाव, कोरेगाव पार्क, येरवडा, धानोरी, नगर रस्ता परिसर, विमाननगर, हडपसर, वडगाव शेरी

तुलनेने कमी तापमान असलेले भाग –
बाणेर, बावधन, कात्रज, कोंढवा, पाषाण, औंध, एनडीए परिसर, मध्यवर्ती पुणे, कोथरूड, सहकार नगर, सिंहगड रस्ता

गेल्या ५० वर्षांतील पुण्याचा तापमान आढावा – २०२१ – २०२६
– शहराचा वेगवान विस्तार
– २०२४ हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्षांपैकी एक
– तापमानाचा आलेख सातत्याने वाढता

२०११-२०२०
– सर्वाधिक उष्ण दशक
– तापमानात सुमारे ०.५ अंश वाढ
– २०१६ आणि २०१९ अत्यंत उष्ण वर्षे

२००१-२०१०
– सरासरी तापमानात ०.३ ते ०.४ अंश वाढ
– रात्रीच्या तापमानात मोठी वाढ

१९९१-२०००
– शहरीकरणाचा वेग वाढला
– तापमानात ०.२ अंश वाढ
– ‘अर्बन हिट आयलंड’ परिणाम जाणवू लागला

१९८१-१९९०
– तापमानात संथ वाढ
– सरासरी तापमानात ०.१ अंश वाढ
– मान्सूनोत्तर उष्णतेत वाढ सुरू

१९७१-१९८०
– पायाभूत सुविधांचा विकास सुरू
– हवामान तुलनेने स्थिर
– शहरीकरण मर्यादित

पुणे तिथे काय उणे! एकीकडे नागरिक उकाड्याने हैराण; तर दुसऱ्या भागात पावसासह गारांचा वर्षाव

महत्त्वाचे निष्कर्ष –
– कमाल तापमानापेक्षा किमान तापमानात अधिक वाढ
– रात्रीचे वातावरण अधिक उष्ण
– दिवस-रात्र तापमानातील फरक कमी झाला
– अत्यंत उष्ण दिवसांची संख्या वाढली
– पुण्याचे हवामान अति-आर्द्रतेकडून निम-कोरड्या श्रेणीकडे
– ५० वर्षांत सरासरी तापमानात १ ते १.२ अंश वाढ

नागरिकांवरील परिणाम
– रात्री झोप न लागणे, अस्वस्थता वाढणे
– एसी आणि विजेचा वापर वाढला
– हिट स्ट्रेस आणि बेचैनी वाढली
– डोकेदुखी, अशक्तपणा, उष्माघाताच्या तक्रारी वाढल्या

Web Title: Pune weather temperature reached to 49 degree pune cooling lost concrete jungle heatwave update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • environment
  • heat wave
  • pune news
  • Sun heat

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.