शेजारधर्म : जयशंकर दौऱ्यावर, संकटकाळात भारतच मदतीला येतो; श्रीलंकेला ४५ कोटी डॉलर्सची मदत ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
कोलंबो, वृत्तसंस्था : चक्रीवादळ दिटवा दरम्यान श्रीलंकेसोबत (Sri Lanka) उभे राहण्याचा भारताला अभिमान आहे आणि ४५ कोटी डॉलर्सचे मदत पॅकेज देऊ केले असल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी मंगळवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांचे विशेष दूत म्हणून श्रीलंकेत असलेले जयशंकर यांनी श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ यांच्या उपस्थितीत हे वक्तव्य केले. त्यांनी मोदींचे एक पत्र राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांना देखील सुपूर्द केले. जयशंकर म्हणाले की, श्रीलंका २०२२ च्या आर्थिक संकटातून नुकतेच सावरत होते, तेव्हा या नैसर्गिक आपत्तीने नवीन आव्हाने निर्माण केली. या पॅकेजमध्ये ३५ कोटी अमेरिकन डॉलर्सचे सवलतीचे कर्ज आणि १० कोटी अमेरिकन डॉलर्सचे अनुदान सहाय्य समाविष्ट श्रीलंका सरकारशी सल्लामसलत करून हे पॅकेज अंतिम केले जात आहे. आमची मदत चक्रीवादळामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या क्षेत्रांना व्यापक असणार असल्याचेही जयशंकर यांनी सांगितले.
१८ कोटी डॉलर्सचे सवलतीच्या दरात कर्ज
१० कोटी डॉलर्सच्या अनुदान मदतीचा समावेश
८० सदस्यांच्या पथकाने केले बचाव कार्य
१,१०० टनांहून अधिक मदत साहित्य
१४.५ टन औषधे पुरवली
६० टन अतिरिक्त उपकरणे श्रीलंकेला पाठविली
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Donald Trump यांचा ‘किल लिस्ट’ प्लॅन? जगातील 3 शक्तिशाली राष्ट्राध्यक्षांच्या हत्येच्या कटाने जागतिक राजकारणात भूकंप
जयशंकर यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधान हरिनी अमरसूर्या यांची भेट घेतली आणि चक्रीवादळ दिटवानंतर श्रीलंकेच्या पुनर्बाधणीसाठी भारताच्या अटल वचनबद्धतेची त्यांना खात्री दिली, जयशंकर आणि श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ यांनी उत्तर प्रांतातील किलिनोच्ची जिल्ह्यात १२० फूट लांबीच्या, दुहेरी-लेन बेली ब्रिजचे संयुक्तपणे उद्घाटन केले. ११० टन वजनाचा हा पूल भारतातून विमानाने आणण्यात आला आणि ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत बसवण्यात आला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Social Change: अजब देश! प्रेयसीला डेट करण्यासाठी सरकार देतंय 31 हजार रुपये; लग्न केल्यास मिळतात 25 लाख, जाणून घ्या नेमकं कारण
जयशंकर म्हणाले की, नुकसानीचे प्रमाण पाहता, भारताने श्रीलंकेला मदत करण्यासाठी पुढे येणे स्वाभाविक होते. भारताचे ‘ऑपरेशन सागर बंधू’ ‘दिटवा’ श्रीलंकेत पोहोचल्याच्या दिवशीच सुरू झाले.आमचे विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत आणि आयएनएस उदयगिरी कोलंबोमध्ये तैनात होते आणि मदत साहित्य पोहोचवत होते, त्यानंतर हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या अनेक एमआय-१७ हेलिकॉप्टरने दोन आठवड्यांहून अधिक काळ श्रीलंकेला मदत पोहोचवली, तर ८० सदस्यांच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने बचाव आणि मदत कार्य केले. ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत एकूण १,१०० टनांहून अधिक मदत साहित्य पोहोचवण्यात आले, ज्यामध्ये कोरडे रेशन, तंबू, ताडपत्री, स्वच्छता किट, आवश्यक कपडे आणि पाणी शुद्धीकरण किट यांचा समावेश होता. सुमारे १४.५ टन औषधे आणि वैद्यकीय उपकरणे देखील पुरवण्यात आली आणि मदत कार्यात मदत करण्यासाठी ६० टन अतिरिक्त उपकरणे श्रीलंकेला आणण्यात आली
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.
Ans: भारताने ४५ कोटी अमेरिकन डॉलर्सचे (सुमारे ३,७०० कोटी रुपये) पुनर्रचना पॅकेज जाहीर केले आहे, ज्यात कर्ज आणि अनुदान समाविष्ट आहे.
Ans: चक्रीवादळ 'दिटवा' मुळे झालेल्या नुकसानीनंतर श्रीलंकेला तातडीची मानवतावादी मदत आणि बचाव कार्यासाठी भारताने राबवलेले हे मिशन आहे.
Ans: भारताने अवघ्या काही दिवसांत ११० टन वजनाचा आणि १२० फूट लांबीचा 'बेली ब्रिज' विमानाने आणून तिथे उभारला आणि त्याचे उद्घाटन केले.






