पूर्वा वळसे पाटील (फोटो- टीम नवराष्ट्र)
मंचर: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या राज्यभर प्रचारसभा देखील सुरू झाल्या आहेत. तसेच प्रत्येक उमेदवार हा मोठ्या जोमाने प्रचार करत आहे. “आंबेगाव तालुक्यातील मंचर ही मध्यवर्ती ठिकाणी असलेली बाजारपेठ आहे. मंचर शहरासाठी दिलीप वळसे पाटील यांचे योगदान मोठे आहे . शहराच्या विकासासाठी वळसे पाटील यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे . मंचर शहराच्या आणखी विकासासाठी पुन्हा एकदा वळसे पाटील यांना साथ द्या ” असे आवाहन राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या संचालिका पूर्वा वळसे पाटील यांनी केले .
आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ मंचर शहर व परिसरात राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या संचालिका पूर्वा वळसे पाटील यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या . यावेळी त्या बोलत होत्या . भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागूजी पिंगळे, शरद बँकेचे संचालक दत्ताशेठ थोरात, मंचर शहर अध्यक्ष सुहास बाणखेले, शरद बँकेचे संचालक अजय घुले,राजेंद्र थोरात,जगदीश घिसे, लक्ष्मण थोरात, अशोक गांजाळे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अरुणा थोरात,आरती थोरात, माणिक गावडे, वेणूताई खरमाळे,वैशाली बेंडे,सोनाली काळे,जागृती महाजन, विजया खेडकर, सविता क्षीरसागर,अक्षदा शिंदे,मालती थोरात, माया देठे,शुभम बाणखेले,संकेत वायकर, खालिदभाई इनामदार, हमीर अली शेख,ज्योती निघोट,आदी पदाधिकारी,ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
पूर्वा वळसे पाटील यांनी मंचरचे ग्रामदैवत श्री .भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन वळसे पाटील यांच्या अष्टविजयाचे साकडे घातले . घराघरांमध्ये जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. अडी – अडचणी समजावून घेतल्या. मंचर शहरातील विविध विकास कामांसाठी वळसे पाटील कटिबद्ध आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या अनुसया महिला उन्नती केंद्राच्या माध्यमातून महिला भगिनींचे अनेक प्रश्न मार्गी लावले जातात . केंद्र राज्य शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अनुसया महिला उन्नती केंद्राशी संपर्क महिलांनी साधावा . असे आवाहन पूर्वाताई वळसे पाटील यांनी केले . यावेळी मंचर शहरातून वळसे पाटील यांनाच मोठे मताधिक्य मिळवून देणार असल्याचे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा: “केवळ आमदारकी डोळ्यासमोर ठेवूनच ते…”; दिलीप वळसे पाटील यांची देवदत्त निकमांवर टीका
दरम्यान महायुतीचे उमेदवार आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांच्यावर टीका केली आहे. आमदारकी डोळ्यासमोर ठेवूनच ते माझ्यासोबत फिरत होते अशी टीका त्यांनी केली आहे.“आपण मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत देवदत्त निकम यांना सभापतीपद देऊन चुक केली . त्यांन तेथे मनमानी कारभार केला . व्यापाऱ्यांचा रोष ओढून घेतला . धना मेथीचा बाजार बंद पाडला. केवळ आमदारकी डोळ्यासमोर ठेवूनच ते माझ्यासोबत तालुका फिरले . ” अशी टीका सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांच्यावर केली.