Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाचे व्यापक नियोजन; मुख्यमंत्री फडवणीस यांची माहिती

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांसह विविध मुक्कामस्थळी जर्मन हॅंगर उभारण्यात आले आहेत. यामुळे वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 25, 2026 | 02:50 PM
पुण्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावर व्यापक तयारी; वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

पुण्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावर व्यापक तयारी; वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

Follow Us
Follow Us:

पुणे : आषाढी वारीदरम्यान पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी राज्य शासनाने व्यापक नियोजन केले आहे. आळंदी, देहू आणि पालखी मार्गावरील सर्व सुविधा सक्षम करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्याच्या पूर्वतयारीसंदर्भात विधानभवनात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, विविध विभागांचे मंत्री, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच पालखी सोहळ्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यंदाच्या वारीसाठी पालखी मार्गावरील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत विविध विकासकामे पूर्ण झाली असून, आळंदी, देहू आणि पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे.

Ashadhi Wari : पंढरीच्या वारीचा ‘असा’ आहे इतिहास; आळंदीहून वारीची …

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांसह विविध मुक्कामस्थळी जर्मन हॅंगर उभारण्यात आले आहेत. यामुळे वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. पुणे विभागाबाहेरील पालख्यांनाही सर्वसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत करण्यात आली असून, पुणे विभागीय आयुक्तांना नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. डीजेमुक्त वारीसाठी पोलीस प्रशासनाने समन्वयाने प्रयत्न करावेत तसेच वारीची पारंपरिक संस्कृती जपली जावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांवर देण्यात आला विशेष भर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले की, पालखी सोहळा प्रमुखांनी केलेल्या मागण्यांनुसार आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. महिलांच्या मुक्कामस्थळी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून, वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे.

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखी मार्गावरील पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांचे नियोजन पूर्ण झाल्याचे सांगितले. पुणे विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी सादरीकरणाद्वारे पुणे विभागातील तयारीची माहिती दिली. आळंदी, देहू, पुणे शहर आणि पालखी मार्गावरील विविध ठिकाणी प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम सुरू केले आहे.

वारी सोहळा जगभर पोहोचणार

यंदाच्या आषाढी वारीचे जागतिक स्तरावर प्रसारण करण्यात येणार असून, डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरचित्रवाहिन्यांद्वारे वारी सोहळा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्राची वारकरी परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि पंढरपूरची भक्तीपरंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: State government makes comprehensive arrangements to prevent inconvenience to warkaris says cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026
  • devendra fadnavis
  • Jaykumar Gore

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
1

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
2

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला
3

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
4

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.