Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राजगड’, ‘घोडगंगा’सह सात साखर कारखान्यांना केंद्राचा झटका; कर्जाचे प्रस्ताव फेटाळले

महाराष्ट्र राज्यातील साखर उद्योगाला आर्थिक उभारी देण्यासाठी राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावांपैकी ७ साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने (एनसीडीसी) मोठा दणका दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 23, 2026 | 06:14 PM
'राजगड', 'घोडगंगा'सह सात साखर कारखान्यांना केंद्राचा झटका; कर्जाचे प्रस्ताव फेटाळले

'राजगड', 'घोडगंगा'सह सात साखर कारखान्यांना केंद्राचा झटका; कर्जाचे प्रस्ताव फेटाळले

Follow Us
Follow Us:

पुणे : महाराष्ट्र राज्यातील साखर उद्योगाला आर्थिक उभारी देण्यासाठी राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावांपैकी ७ साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने (एनसीडीसी) मोठा दणका दिला आहे. यामध्ये पुण्यातील तीन महत्त्वाच्या कारखान्यांचा समावेश असून, कर्ज नाकारल्या गेल्यामुळे या कारखान्यांच्या आगामी गाळप हंगामावर आणि शेतकऱ्यांच्या पेमेंटवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. राज्य सरकारने एकूण १४ कारखान्यांना कर्ज मिळण्यासाठी केंद्राकडे शिफारस केली होती. मात्र, तांत्रिक आणि आर्थिक निकषांवर बोट ठेवत एनसीडीसी ने केवळ ७ कारखान्यांना मंजुरी दिली, तर उर्वरित ७ प्रस्ताव नामंजूर केले आहेत.

 

पुण्यातील ३ कारखान्यांना फटका

कर्ज नाकारण्यात आलेल्या ७ कारखान्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील ग्रामीण अर्थकारणाचे केंद्र असलेल्या तीन बड्या कारखान्यांचा समावेश आहे.

१. रावसाहेबदादा पवार घोडगंगा कारखाना (शिरूर)

२. श्री छत्रपती साखर कारखाना (इंदापूर)

३. राजगड सहकारी साखर कारखाना (भोर)

याशिवाय जालना येथील रामेश्वर, धाराशिवचा विठ्ठलसाई, सोलापूरचा सिद्धेश्वर आणि अहिल्यानगरचा कुकडी कारखाना या प्रशासकीय कारवायांच्या तडाख्यात सापडले आहेत.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखालील ‘राजगड’ कारखान्याला कर्ज नाकारल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. थोपटे यांच्या अलीकडील राजकीय हालचाली आणि पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र, अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याची कमकुवत आर्थिक स्थिती हेच यामागचे मुख्य कारण असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.

ही आहेत कर्ज नाकारण्याची कारणे

राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने प्रस्ताव फेटाळताना अत्यंत कडक तांत्रिक कारणे दिली आहेत

सलग ३ वर्षे तोटा : संबंधित कारखाने मागील तीन वर्षांपासून सातत्याने तोट्यात आहेत.

थकीत एफआरपी (FRP) : शेतकऱ्यांच्या उसाची देणी वेळेवर न देणे.

आर्थिक अनियमितता : कारखान्यांच्या व्यवस्थापनात आढळलेल्या त्रुटी आणि हिशोबातील तफावत.

भाडेतत्त्वावर संचालन : काही कारखाने स्वतः न चालवता खाजगी तत्वावर चालवण्यास दिल्याने कर्ज नाकारण्यात आले.

भांडवलाची कमतरता : आवश्यक भागभांडवल नसणे आणि जुन्या कर्जाची परतफेड न होणे.

शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार

पुणे जिल्ह्यातील साखर पट्ट्यात या निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. कर्ज नाकारल्यामुळे कारखान्यांकडे खेळते भांडवल राहणार नाही. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलावर (FRP) होणार असून, खते, मजुरी आणि मशागतीसाठी पैशांची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच, कारखान्यांचे आधुनिकीकरण थांबल्यास उत्पादन क्षमतेवरही परिणाम होणार असून, पर्यायाने साखर उद्योगासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

हे सुद्धा वाचा : हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, नेमकं काय झाली चर्चा?

Web Title: The central government has denied loans to seven sugar factories in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Farmers
  • maharashtra
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार
1

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे
2

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे

Torrent Hydraulic Power Project: टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्टला ग्रामस्थांचा विरोध; आंबोटपाठोपाठ भालीवडीतही जागेची मोजणी रद्द
3

Torrent Hydraulic Power Project: टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्टला ग्रामस्थांचा विरोध; आंबोटपाठोपाठ भालीवडीतही जागेची मोजणी रद्द

Bhimashankar Temple: श्रावणानंतर भीमाशंकर परिसर चकाचक; भीमा नदीच्या उगमस्थळातून प्लास्टिक, गाळ अन् निर्माल्याची सफाई
4

Bhimashankar Temple: श्रावणानंतर भीमाशंकर परिसर चकाचक; भीमा नदीच्या उगमस्थळातून प्लास्टिक, गाळ अन् निर्माल्याची सफाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.