Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजगुरुनगर बँकेच्या वार्षिक सभेला गालबोट, दोन सभासदांत हाणामारी; नेमकं काय घडलं?

राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार राडा झाला आहे. संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 09, 2025 | 01:22 PM
राजगुरुनगर बँकेच्या वार्षिक सभेला गालबोट, दोन सभासदांत हाणामारी; नेमकं काय घडलं?

राजगुरुनगर बँकेच्या वार्षिक सभेला गालबोट, दोन सभासदांत हाणामारी; नेमकं काय घडलं?

Follow Us
Close
Follow Us:

राजगुरूनगर/ प्रभाकर जाधव : पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेची ९४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. ७) चंद्रमा गार्डन येथे पार पडली. मात्र सभेदरम्यान एका तरुण सभासदाच्या वारंवार प्रश्नोत्तरांमुळे निर्माण झालेल्या वादातून दोन सभासदांमध्ये शिवीगाळ आणि हाणामारी झाली. त्यामुळे बँकेच्या वार्षिक सभेला प्रथमच गालबोट लागले आहे. इतर सभासदांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित व्यक्तीला बाहेर काढत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

सभेला बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, उपाध्यक्ष अश्विनी पाचारणे, ज्येष्ठ संचालक किरण आहेर, तसेच संचालक मंडळाचे सदस्य, तज्ञ संचालक, वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले, तर उपाध्यक्षांनी आभार मानले. सभेत मांडलेले सर्व विषय शेवटी सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी सभासदांकडून अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारले गेले. त्याला अध्यक्ष सागर पाटोळे, संचालक किरण आहेर आणि सीईओ शांताराम वाकचौरे यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

दरम्यान, अध्यक्ष पाटोळे यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेत सांगितले की, ग्राहकांसाठी इंटरनेट बँकिंग सुविधा सुरू करण्यात आली असून, सहकार क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल बँकेला विविध पुरस्कार मिळाले आहेत. तसेच बँकेने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी अनुदान पात्र कर्जवाटप करणारी पुणे जिल्ह्यातील पहिली बँक म्हणून मान मिळवल्याचेही त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : पुणे ग्रामीण पोलीसांवर वाढता ताण; लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची कमतरता

बँकेचे माजी अध्यक्ष दिनेश ओसवाल यांची पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल आणि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनकडून मिळालेल्या द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सभेतील वातावरण एकूण सकारात्मक असले तरी तरुण सभासदाच्या वादामुळे झालेल्या हाणामारीमुळे बँकेच्या वार्षिक सभेवर अनपेक्षित गालबोट लागले.

हे सुद्धा वाचा : आंदेकर-गायकवाड टोळ्यांनी गुन्हेगारीतील ‘तो’ नियम मोडला; पोलिसही गेले चक्रावून

Web Title: There has been a controversy at the annual meeting of rajgurunagar bank

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 01:21 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • crime news
  • Rajgurunagar

संबंधित बातम्या

बालविवाहास प्रोत्साहन देताय अन्…? मग सावधान; ‘ही’ शिक्षा होणार, वाचा सविस्तर
1

बालविवाहास प्रोत्साहन देताय अन्…? मग सावधान; ‘ही’ शिक्षा होणार, वाचा सविस्तर

धावत्या पीएमपी बसमध्ये महिला कंडक्टरवर जीवघेणा हल्ला; चाकू मांडीत खुपसला अन्…
2

धावत्या पीएमपी बसमध्ये महिला कंडक्टरवर जीवघेणा हल्ला; चाकू मांडीत खुपसला अन्…

चालत्या एक्सप्रेसवर पडला दरोडा! पोलिसांच्या हातावर तुरी देऊन महिला प्रवाशांचं सोनं लुटलं
3

चालत्या एक्सप्रेसवर पडला दरोडा! पोलिसांच्या हातावर तुरी देऊन महिला प्रवाशांचं सोनं लुटलं

Crime News: पोलिस ठाण्यातच महिलांची फ्री-स्टाईल हाणामारी, केस ओढत, एकमेकींचे फाडले कपडे; सहा जणींवर गुन्हा दाखल
4

Crime News: पोलिस ठाण्यातच महिलांची फ्री-स्टाईल हाणामारी, केस ओढत, एकमेकींचे फाडले कपडे; सहा जणींवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.