Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimri Chinchwad : धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे प्रशासनाची धावपळ; ‘या’ तारखेनंतर पाणीकपातीच्या निर्णयाचे संकेत

'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने पिंपरी-चिंचवड शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट घोंघावू लागले आहे. पवना धरणातील पाणीसाठा धोकादायक पातळीपर्यंत खालावल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 16, 2026 | 04:00 PM
धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे प्रशासनाची धावपळ; 'या' तारखेनंतर पाणीकपातीच्या निर्णयाचे संकेत

धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे प्रशासनाची धावपळ; 'या' तारखेनंतर पाणीकपातीच्या निर्णयाचे संकेत

Follow Us
Follow Us:

पिंपरी/विजया गिरमे : ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने पिंपरी-चिंचवड शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट घोंघावू लागले आहे. शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना धरणातील पाणीसाठा धोकादायक पातळीपर्यंत खालावल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, महापौर रवी लांडगे यांनी सोमवारी (दि. १५) घेतलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील पाणी जपून वापरण्याचे कडक आदेश देत, खासगी व महापालिकेचे जलतरण तलाव तातडीने बंद करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

 

पाणी कपातीची ‘डेडलाईन’

पिपंरी चिंचवड शहराला दररोज ६५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो, ज्यामध्ये पवना धरणाचा वाटा मोठा आहे. सध्या धरणात केवळ २० टक्के पाणीसाठा शिल्लक असून, पावसाने २५ जूनपर्यंत हजेरी न लावल्यास शहरात पाणीकपात लागू करण्याचा निर्णय अटळ असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे. मागील साडेसहा वर्षांपासून शहर ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठ्याचा त्रास सहन करत आहे; त्यातच आता नैसर्गिक आपत्तीची भर पडल्याने नागरिकांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे.

वॉशिंग सेंटर्स आणि बांधकामांना लगाम

पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करण्यासाठी महापौरांनी कडक पावले उचलली आहेत. शहरातील ज्या वॉशिंग सेंटर्सवर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे, त्यांचे तत्काळ सर्वेक्षण करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे, तसेच नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, सुरू असलेल्या बांधकामांना महापालिकेतर्फे दिला जाणारा पाणीपुरवठा तातडीने खंडित करावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी आयुक्तांना दिल्या आहेत.

भामा-आसखेड प्रकल्प: नियोजनाचा फज्जा

शहराची वाढती लोकसंख्या पाहता, भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय ढिसाळपणामुळे हा प्रकल्प रेंगाळला आहे. डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण होण्याचे उद्दिष्ट असताना, आता कामाचा वेग पाहता तो मार्च २०२६ पर्यंत लांबणीवर पडला आहे. या विलंबामुळे पाणीटंचाईवर मात करण्याचा महापालिकेचा प्रयत्न फसला असून, नागरिक मात्र पाण्यासाठी वणवण करत आहेत.

नगरसेवकांचा ‘राजकीय पवित्रा’

पाणीटंचाईच्या गंभीर विषयावर चर्चा सुरू असतानाच, सभेत एक वेगळाच वाद निर्माण झाला. फुगेवाडीतील विषारी दारू बळींच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी सर्व नगरसेवकांच्या एका महिन्याच्या मानधनातून मिळून प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची सूचना महापौरांनी केली होती. मात्र, ‘चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणे योग्य नाही’ असे म्हणत अनेक नगरसेवकांनी या सूचनेला थेट विरोध केला. एका बाजूला शहराच्या मूलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न गंभीर होत असताना, दुसरीकडे नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे महापालिकेतील राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

हे सुद्धा वाचा : भांडण सोडविण्यासाठी जाण तरुणाला भोवलं; पोटावर अन् मानेवर सपासप वार करुन खून

नागरिकांना संयमाचे आवाहन

धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने, पाटबंधारे विभागाने १५ टक्के पाणी कपातीची पूर्वसूचना दिली आहे. महापौर लांडगे यांनी नागरिकांना घाबरून न जाता उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. लवकरच पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेऊन कपातीचे स्वरूप निश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: There is a possibility of a severe water shortage crisis arising in pimpri chinchwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri Chinchwad
  • water issues

संबंधित बातम्या

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…
1

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
2

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वसतिगृह; २० गुंठे जमीन देण्याचे आमदार शंकर जगताप यांचे आश्वासन
3

सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वसतिगृह; २० गुंठे जमीन देण्याचे आमदार शंकर जगताप यांचे आश्वासन

पिंपरी-चिंचवडमधील खड्डे 48 तासांत बुजवा, कामचुकारपणा केल्यास…; आयुक्तांचे महापालिका अधिकाऱ्यांना कडक निर्देश
4

पिंपरी-चिंचवडमधील खड्डे 48 तासांत बुजवा, कामचुकारपणा केल्यास…; आयुक्तांचे महापालिका अधिकाऱ्यांना कडक निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.