Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: ‘या’ शहरात ऊन-पावसाचा खेळ कायम राहणार; पुढील तीन दिवस यलो अलर्ट

जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह ताशी ५० ते ६० किलोमीटर वाऱ्यासह गारांचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 31, 2026 | 08:00 PM
राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस; उकाड्यातून दिल्लीकरांना दिलासा...

राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस; उकाड्यातून दिल्लीकरांना दिलासा...

Follow Us
Follow Us:

पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा
ऊन पावसाचा खेळ कायम राहणार
पुण्याला तीन दिवस यलो अलर्ट

पुणे: पुणे शहरात सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने आणि वादळी वाऱ्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पुढील चार दिवस ऊन-पावसाचा खेळ कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून पुण्यास पुढील तीन दिवस ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.

मंगळवारी (ता. ३१) शहरात किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसने घट होऊन ते १९.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसवर स्थिर राहिले. सकाळी कडक ऊन जाणवले, मात्र दुपारनंतर वातावरण ढगाळ झाले. उपनगरांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.

बुधवारी (ता. १) कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान सुमारे २० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आकाश सकाळी निरभ्र राहून दुपारनंतर अंशतः ढगाळ होईल. तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची तर काही ठिकाणी गारा पडण्याची  शक्यता आहे.

चिखलमय रस्ते आणि वाहतूक कोंडी; पिंपरी-चिंचवडकरांना अवकाळी पावसाचा मोठा तडाखा

दरम्यान, जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह ताशी ५० ते ६० किलोमीटर वाऱ्यासह गारांचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांत तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच  पुढील काही दिवस दुपारनंतर ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि हलक्या सरींचा अंदाज कायम राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका; 

पिंपरी-चिंचवडकरांना अवकाळी पावसाचा मोठा तडाखा

अवकाळी पावसाच्या पहिल्याच सरीत पिंपरी-चिंचवड शहरातील पायाभूत सुविधांची पोलखोल झाली असून महापालिकेच्या मान्सूनपूर्व नियोजनातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि वीजपुरवठा खंडित होणे अशा समस्यांनी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.सोमवारी (दि. ३०) दुपारी मेघगर्जना आणि गारांच्या सरींसह सुमारे एक ते दोन तास कोसळलेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत केले. अनेक भागांत पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला, तर काही ठिकाणी पूर्णतः ठप्प झाला.

Web Title: Weather department gave yellow alert to pune city latest rain and summer updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • Pune Rain News
  • Pune Weather
  • Weather Update

संबंधित बातम्या

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
1

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…
2

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…

Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?
3

Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट
4

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.