Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीच्या पाणी प्रश्नावर युगेंद्र पवारांची भूमिका स्पष्ट, ‘पवार vs पवार’ निवडणुकीवरही मोठं विधान; तर सुनेत्रा पवारांच्या…

Yugendra Pawar: युगेंद्र पवार यांनी बारामतीच्या जिरायत भागाचा दौरा करून पाणी प्रश्नावर भूमिका मांडली. अजित पवारांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी आणि कौटुंबिक ऐक्यावरही त्यांनी भाष्य केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 01, 2026 | 07:55 PM
बारामतीच्या पाणी प्रश्नावर युगेंद्र पवारांची भूमिका स्पष्ट (Photo Credit- X)

बारामतीच्या पाणी प्रश्नावर युगेंद्र पवारांची भूमिका स्पष्ट (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • बारामतीच्या पाणी प्रश्नावर युगेंद्र पवारांची भूमिका स्पष्ट
  • ‘पवार vs पवार’ निवडणुकीवरही मोठं विधान
  • तर सुनेत्रा पवारांच्या…
Yugendra Pawar Press Conferance: बारामती (Baramati) तालुक्यातील जिरायत भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि पाणी प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी नुकताच दौरा केला. या दौऱ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पाणी नियोजन, कौटुंबिक कलह आणि अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवर आपली सविस्तर भूमिका मांडली.

पाणी प्रश्नावर आक्रमक पाठपुरावा

युगेंद्र पवार यांनी सांगितले की, उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना जानाई-शिरसाई योजनेचे पाणी सुटत नव्हते. यासाठी त्यांनी १६ एप्रिल रोजी पुणे सिंचन भवन येथे जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. सिंचन भवनच्या पाठपुराव्यामुळे २२ एप्रिलला शिरसाईचे तर २९ एप्रिलला जानाई योजनेचे पाणी सुटले आहे. आगामी काळात जानाई योजनेचे सर्व सहा पंप पूर्ण दाबाने सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाऊस कमी होण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि प्रथम पिण्याच्या पाण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

“अजित पवार सोबत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती”

पूर्वी अजित पवार सोबत असताना प्रशासनावर त्यांचा वचक होता आणि कामे आपोआप मार्गी लागत होती. मात्र, आता ते सोबत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात पाणी वेळेवर मिळेल का, अशी भीती निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण मैदानात उतरल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. नीरा-कऱ्हा जोडो हा प्रकल्प अजित पवारांचे स्वप्न असून बारामतीकरांचीही तीच इच्छा आहे. मात्र, फडणवीसांनी अधिवेशनात उल्लेख करूनही निधी दिला नसल्याने त्यांनी शंका व्यक्त केली. जानाई बंद पाईपलाईनचे काम पुढील २-३ वर्षात सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

युगेंद्र पवार यांची कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा; येत्या 2 दिवसांत…

पवार विरुद्ध पवार आणि कौटुंबिक ऐक्य

पवार विरुद्ध पवार अशी लढत व्हायला नको हे म्हणणं आहे. याआधी मी देखील बोललो आहे, जय देखील बोलला आहे. काल सुप्रियाताईंचं वक्तव्य मी ऐकलं. सुनेत्रा काकी देखील बोलल्या आहेत. त्यामुळे आम्ही कुटुंब म्हणून एक असलं पाहिजे, पवार विरुद्ध पवार अशी लढाई व्हायला नाही पाहिजे, अशी भूमिका युगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली.

अजित पवारांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी

अजित पवारांच्या अपघातासंदर्भात आणि रोहित पवारांच्या आरोपांवर भाष्य करताना त्यांनी पारदर्शक चौकशीची मागणी केली. “सीआयडी, डीजीसीए आणि सीबीआय तपास करत आहेत. प्राथमिक अहवालातील काही गोष्टी पटण्यासारख्या नाहीत, मात्र आपण तपासाला सहकार्य केले पाहिजे. चौकशी पारदर्शक असावी आणि लवकर सत्य बाहेर यावे, हीच आमची इच्छा आहे,” असे त्यांनी नमूद केले.

सुनेत्रा पवारांच्या विजयाचा विश्वास

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना त्यांनी सुनेत्रा पवारांना मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला. “दादांचे काम पाहून बारामतीकरांनी सुनेत्रा वहिनींना भरभरून मतदान केले आहे. २ लाख २४ हजार मतांपैकी किमान २ लाख २० हजार मते त्यांना मिळतील,” असा दावा त्यांनी केला.

बारामतीत वीजपुरवठ्यावरून युगेंद्र पवार आक्रमक; सायंकाळी फोर्स लोडशेडिंग थांबवण्याची मागणी

Web Title: Yugendra pawar press conference baramati tour water issue ajit pawar inquiry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • rohit pawar
  • Sunetra Pawar
  • Yugendra Pawar

संबंधित बातम्या

माळेगाव साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे; बिनविरोध निवड, सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धार
1

माळेगाव साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे; बिनविरोध निवड, सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धार

भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर…; रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला
2

भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर…; रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली बारामतीतील विकासकामांची केली पाहणी; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश
3

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली बारामतीतील विकासकामांची केली पाहणी; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश

काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टीकेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विधानावरून मोठे वक्तव्य
4

काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टीकेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विधानावरून मोठे वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.