एक यशस्वी असे उद्योजक, आदर्श असे समाजसेवी असा संगम राहुल बजाज यांच्या जीवनात झालेला होता. त्यांनी टू व्हीलरच्या बाबतीत त्यांनी क्रांती केली जगामध्ये सर्वपरिचीत आहे.बजाज हे नाव त्यांच्यामुळे नावलौकिक झाले. अतिशय जिद्दीने तळमळीने कुठे काय सुधारणांच्या संदर्भात कुठे काय क्रांती करता येईल या सतत शोध घेणारे ते होते. अशी प्रतिक्रिया श्रद्धांजली महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी देत राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली.
बजाज ग्रुपचे अध्यक्ष राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. ते गेल्या काही वर्षापासून कॅन्सरशी झुंज देत होते. राहुल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली. एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवर देखील त्यांनी भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक कार्यही उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी त्याचे उत्तम उदाहरण होते.
राहुल बजाज हे विशेषत: उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्याच्या उद्योग विश्वाचे नुकसान झाले आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात म्हणतात.[read_also content=”‘राहुल बजाज यांच्या जाण्याने राज्याच्या उद्योगविश्वाचे नुकसान’, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत – शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या दिल्या सूचना https://www.navarashtra.com/maharashtra/chief-minister-uddhav-thackeray-reaction-about-rahul-bajaj-death-nrsr-237136.html”]