Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad ZP School : चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत; शाळा प्रवेशोत्सवात रंगला प्रेरणादायी संवाद

पनवेल येथील पीएमश्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाळ येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चौथीच्या विद्यार्थिनीने त्यांची मुलाखत घेत आगळावेगळा संवाद साधला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 15, 2026 | 06:27 PM
चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत; शाळा प्रवेशोत्सवात रंगला प्रेरणादायी संवाद

चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत; शाळा प्रवेशोत्सवात रंगला प्रेरणादायी संवाद

Follow Us
Follow Us:
  • इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत
  • शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी डिजिटल शिक्षणाबाबत दिला प्रेरणादायी संदेश
  • विद्यार्थिनीने विचारले प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी दिले प्रेरणादायी मार्गदर्शन
भारत रांजणकर, रायगड : पनवेल येथील पीएमश्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाळ येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी संवाद घडला. शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेत शिक्षण, सामाजिक कार्य आणि डिजिटल युगातील बदलांबाबत प्रश्न विचारले. विद्यार्थिनीच्या आत्मविश्वासपूर्ण प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास माजी खासदार रामशेठ ठाकूर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Karjat News : ऐन उन्हाळ्यात पाणी संकट ; कर्जत तालुक्यातील गावकऱ्य़ांचे होतायत हाल

आपल्या सार्वजनिक जीवनाच्या प्रवासाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थी म्हणून भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करताना विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत-सोडवत त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास सुरू झाला. समाजात सकारात्मक बदल घडवून आणताना संघर्ष अपरिहार्य असतो, मात्र चांगल्या कार्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांतून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.

डिजिटल युगातील शिक्षणाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, डिजिटल शिक्षण हे काळाची गरज असून भविष्यातील शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. या कार्यक्रमादरम्यान शाळेतील आयडियल सेंटर लॅबचे उद्घाटन व पाहणी करण्यात आली. या डिजिटल लॅबमुळे विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून विषय अधिक प्रभावीपणे समजून घेता येतील. तसेच प्रश्नोत्तरे, स्वमूल्यमापन आणि ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होणार असल्याने शिक्षण अधिक दर्जेदार आणि आकर्षक होईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. तसेच नवागत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी डिजिटल लॅबचा नियमित वापर करून ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास वाढविण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची आणि मुलाखत घेण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थिनीने घेतलेली ही मुलाखत आणि त्यातून मिळालेला प्रेरणादायी संदेश हा शाळा प्रवेशोत्सवाचा विशेष आकर्षण ठरला.

Raigad News : धावत्या बसचं चाक निखळलं अन्… आगार व्यवस्थापकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

Web Title: Cm devendra fadnavis interviewed by class 4 student at panvel school event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • raigad
  • ZP School

संबंधित बातम्या

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा
1

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा

Raigad News: श्रीवर्धन नगरपरिषदेत अनधिकृत बांधकामांवर नगरसेवक आक्रमक; सरसकट कारवाईचा ठराव
2

Raigad News: श्रीवर्धन नगरपरिषदेत अनधिकृत बांधकामांवर नगरसेवक आक्रमक; सरसकट कारवाईचा ठराव

Raigad News: माथेरानच्या शारलोट लेकचा गाळ नेमका कुठे गेला? 1000 ब्रास मातीवरून खळबळ, आरोप-प्रत्यारोपांना उधाण
3

Raigad News: माथेरानच्या शारलोट लेकचा गाळ नेमका कुठे गेला? 1000 ब्रास मातीवरून खळबळ, आरोप-प्रत्यारोपांना उधाण

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण
4

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.