Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : दरडीच्या भीतीने डिकसळ-पाली हादरले; अंधारात जीव मुठीत घेऊन शाळेत आश्रय, सुविधांचा मात्र अभाव

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील डिकसळ-पाली गावातील आदिवासी बांधव मुसळधार पावसामुळे भीषण संकटाचा सामना करत आहेत. दरड कोसळण्याच्या भीतीमुळे ७ ते ८ कुटुंबांना जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, तेथे पिण्याचे पाणी, अन्न आणि अन्य मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 11, 2026 | 11:34 AM
दरडीच्या भीतीने डिकसळ-पाली हादरले; अंधारात जीव मुठीत घेऊन शाळेत आश्रय, सुविधांचा मात्र अभाव

दरडीच्या भीतीने डिकसळ-पाली हादरले; अंधारात जीव मुठीत घेऊन शाळेत आश्रय, सुविधांचा मात्र अभाव

Follow Us
Follow Us:
  • डिकसळ-पालीतील ग्रामस्थ समस्यांच्या विळख्यात
  • दरडीच्या सावटाखाली रात्री शाळेत आसरा
  • अंधारात जीव मुठीत घेऊन शाळेत आश्रय
कर्जत : कर्जत तालुक्यातील डिकसळ-पाली येथील आदिवासी बांधव आणि ग्रामस्थ सध्या अत्यंत बिकट व गंभीर समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. मुसळधार पावसामुळे गावात दरड कोसळण्याची तीव्र भीती निर्माण झाली असून, गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण गाव अंधारात चाचपडत आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने सुमारे ७ ते ८ कुटुंबांना रात्रीच्या वेळी पाली येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या तात्पुरत्या छावणीत ना पिण्याचे पाणी, ना जेवणाची सोय, अशी दुरवस्था असल्याने आपत्तीग्रस्त नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

दरम्यान घरांवर कधीही दरड कोसळून झोपेतच काळ घाला घालेल, या भीतीने गेल्या ५-६ दिवसांपासून येथील ग्रामस्थ प्रचंड मानसिक दडपणाखाली आहेत. रात्री २ वाजताच्या सुमारास जेव्हा भीती वाढते, तेव्हा स्थानिक नागरिक रस्त्यावरील साचलेल्या घाण व चिखलाच्या पाण्यातून वाट काढत कसेबसे या जिल्हा परिषद शाळेत धावत येतात. परंतु, तिथे आल्यावरही त्यांची कोणतीही दखल घेणारे तिथे हजर नसते, असा गंभीर आरोप येथील महिलांनी केला आहे.

Karjat News :   Torrent Hydropower Project साठी सुरू असलेल्या ड्रिलिंगमुळे पर्यावरण धोक्यात? कर्जतमध्ये ग्रामस्थांचा संताप

स्थानिक नागरिकांनी प्रशासकीय ढिसाळ कारभाराचा पाढा वाचताना अत्यंत गंभीर बाबी समोर आणल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेचे छत पूर्णपणे गळत असून, संपूर्ण वर्गांमध्ये चिखल आणि पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना तिथे साधे बसायला किंवा झोपायलाही कोरडी जागा उपलब्ध नाही. तसेच गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने आधीच गाव अंधारात आहे, त्यात शाळेतही लाईटची कोणतीही व्यवस्था नाही. मोबाईलची चार्जिंग संपल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधणेही कठीण झाले आहे. अशा अंधारात अचानक दरड कोसळली, तर नक्की कुठे पळायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

तसेच आमच्या एवढ्या मोठ्या कुटुंबांना घेऊन एका छोट्याशा आणि गळक्या शाळेत रात्र काढणे अशक्य होत आहे. गर्दीच्या ठिकाणी लहान मुले घाबरून रात्रभर रडत असतात. त्यांना या ओलसर, दमट आणि अंधाऱ्या जागेत ठेवल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या स्थानिक महिलांनी संताप व्यक्त करत म्हटले की, “एवढ्या मोठ्या कुटुंबांना घेऊन त्या छोट्याशा गळक्या शाळेत राहणे नरकयातना भोगण्यासारखे आहे. जर दरड कोसळून आम्ही मेलो, तर नंतर जाहीर होणारे ५-५ लाख रुपये आम्हाला नको आहेत, ते प्रशासनाने स्वतःकडेच ठेवावेत. आम्ही जिवंत आहोत तोवरच आमची सुरक्षित राहण्याची सोय करा.” ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, जर प्रत्येक २-३ कुटुंबांना राहण्यासाठी वेगळी हक्काची खोली मिळाली आणि वीज-पाण्याची सोय झाली तर आम्ही तिथे राहण्यास तयार आहेत.

या संवेदनशील परिस्थितीमुळे स्थानिक प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाचे पुरते वाभाडे निघाले आहेत. केवळ कागदावर आणि तोंडी आदेश देऊन नागरिकांना स्थलांतरित करायचे आणि त्यांच्या मूलभूत गरजांकडे पाठ फिरवायची, या कारभारामुळे प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोणतीही मोठी जीवितहानी होण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात तात्काल लक्ष घालून डिकसळ पालीतील नागरिकांची योग्य व सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Karjat Heavy Rain : कर्जतमध्ये मुसळधार पावसाचा कहर; उल्हास नदीला पूर, चार पूल पाण्याखाली

Web Title: Diksal pali landslide threat tribal villagers without electricity relief facilities karjat news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • Karjat
  • raigad
  • Rain Update

संबंधित बातम्या

Rain Update : 9 दिवसांतच पावसाचा हाहा:कार; जुलैच्या पावसाने भरली जूनमधील तूट
1

Rain Update : 9 दिवसांतच पावसाचा हाहा:कार; जुलैच्या पावसाने भरली जूनमधील तूट

Karjat News :  Torrent Hydropower Project साठी सुरू असलेल्या ड्रिलिंगमुळे पर्यावरण धोक्यात? कर्जतमध्ये ग्रामस्थांचा संताप
2

Karjat News :  Torrent Hydropower Project साठी सुरू असलेल्या ड्रिलिंगमुळे पर्यावरण धोक्यात? कर्जतमध्ये ग्रामस्थांचा संताप

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अक्षरश: कहर; आतापर्यंत 38.32 टक्के पावसाची नोंद
3

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अक्षरश: कहर; आतापर्यंत 38.32 टक्के पावसाची नोंद

Karjat Heavy Rain : कर्जतमध्ये मुसळधार पावसाचा कहर; उल्हास नदीला पूर, चार पूल पाण्याखाली
4

Karjat Heavy Rain : कर्जतमध्ये मुसळधार पावसाचा कहर; उल्हास नदीला पूर, चार पूल पाण्याखाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.