Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: कळंबच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य! धोकादायक वळणावर वाहनचालकांची कसरत, प्रशासनाकडे केली ‘ही’ मागणी

कर्जत मुरबाड मार्गवरील कळंब गावाजवळील रस्त्यात दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळते. त्यामुळे कळंबच्या धोकादायक वळणावर जीव मुठीत घेऊन वाहन चालवण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 23, 2026 | 12:24 PM
Raigad News: कळंबच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य! धोकादायक वळणावर वाहनचालकांची कसरत, प्रशासनाकडे केली 'ही' मागणी

Raigad News: कळंबच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य! धोकादायक वळणावर वाहनचालकांची कसरत, प्रशासनाकडे केली 'ही' मागणी

Follow Us
Follow Us:
  • कळंब पोलीस स्टेशनजवळील धोकादायक वळणावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
  • रस्ता सरळ करण्यासाठी प्रस्तावित पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने कळंबजवळील महामार्गाचा भाग अपूर्ण राहिला आहे.
  • खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी न करता पुलाचे काम पूर्ण करून रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कर्जत: कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील कळंबचा हा वळणदार रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात सापडतो, यंदाही त्याला अपवाद ठरला नाही. कळंब पोलीस स्टेशनच्या पुढील धोकादायक वळणावर सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग हा महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावर दिवसभर मोठ्या संख्येने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.

Raigad News: गोदरेज कंपनीतील स्थानिकांच्या हितासाठी ठाकरे गट मैदानात; कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार

राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे नाव देण्यात आलेल्या कर्जत मुरबाड मार्गवरील कळंब गावाजवळील रस्ता अद्याप काँक्रीटचा बनवला नाही. कळंबजवळील या वळणाचा भाग अद्याप काँक्रीट करण्यात आलेला नाही. रस्ता सरळ करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने वळणाचा हा भाग अपूर्ण राहिला आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडत असल्याचे चित्र आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारीत असलेल्या शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची तात्पुरती कार्यवाही केली जाते. त्यात पाऊस आणि अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे काही दिवसांतच हे खड्डे पुन्हा उखडतात.

काम झालेल्या नाल्यावरील पूल तातडीने सुरू करा !

दरवर्षी खड्डे बुजविण्याऐवजी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे, कळंबजवळील अपूर्ण राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरण तातडीने पूर्ण करावे, रस्ता सरळ करण्यासाठी रखडलेले पुलाचे काम पूर्ण करावे तसेच पूर्ण झालेला नाल्यावरील पूल तातडीने वाहतुकीसाठी सुरू करावा, अशी मागणी आहे.

‘या’ आहेत मागण्या

  • कळंबजवळील अपूर्ण काँक्रीट रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून रस्ता सरळ करण्यात यावा.
  • अनेक वर्षांपासून रखडलेले पुलाचे काम मार्गी लावावे.
  • पूर्ण झालेला नात्यावरील पूल वाहतुकीसाठी खुला करावा आणि तोपर्यंत धोकादायक वळणावरील खड्चांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी.
Bhuleshwar Ganapati Incident: मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट; ‘भुलेश्वरचा राजा’ची मूर्ती कोसळली, दोघांचा मृत्यू

पावसाळा आला की खड्डे पडतात, खड्डे बुजवतात, पाऊस थांबल्यावर पुन्हा खड्डे दिसतात. दरवर्षी अशी परिस्थिती ही गंभीर आहे. खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा रखडलेले पुलाचे काम पूर्ण करून रस्ता कायमस्वरूपी काँक्रीट करणे गरजेचे आहे. एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची प्रशासनाने वाट पाहू नये. -मूहिब लोगडे, सामाजिक कार्यकर्ते

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Karjat murbad highway potholes put drivers at risk dangerous kalamb turn demands permanent road repair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

४५ मिनिटांचा प्रवास आता २० मिनिटांत! जेव्हीपीडी उड्डाणपुलाचे काम वेगात, २०२७ मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार
1

४५ मिनिटांचा प्रवास आता २० मिनिटांत! जेव्हीपीडी उड्डाणपुलाचे काम वेगात, २०२७ मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार

Exclusive Navarashtra-Navadurga: चेहरा जळाला, पण स्वप्नं नाही! शरीरावर भाजल्याचे व्रण असतानाही मिताली बनली सुपरमॉडेल
2

Exclusive Navarashtra-Navadurga: चेहरा जळाला, पण स्वप्नं नाही! शरीरावर भाजल्याचे व्रण असतानाही मिताली बनली सुपरमॉडेल

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार
3

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार

Social Media Controversy : अमेरिकेच्या नेव्ही डे पोस्टमध्ये भारतीय नौदलाचे फोटो; सोशल मीडियावर चर्चा
4

Social Media Controversy : अमेरिकेच्या नेव्ही डे पोस्टमध्ये भारतीय नौदलाचे फोटो; सोशल मीडियावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.