Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: कर्जतमध्ये टोरंट पॉवर प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध; जमिनी देण्यास नकार, ग्रामसभेत ठराव मंजूर

कर्जत तालुक्यातील टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. जमिनीचे दर निश्चित न करताच अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप करत पाच गावांतील शेतकरी एकवटले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 29, 2026 | 02:42 PM
Raigad News: कर्जतमध्ये टोरंट पॉवर प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध; जमिनी देण्यास नकार, ग्रामसभेत ठराव मंजूर

Raigad News: कर्जतमध्ये टोरंट पॉवर प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध; जमिनी देण्यास नकार, ग्रामसभेत ठराव मंजूर

Follow Us
Follow Us:
  • टोरंट पॉवर प्रकल्पाच्या रस्त्यासाठी जमीन अधिग्रहणाला भालिवडी, आंबोट, पोटल, पाली आणि हुमगाव येथील शेतकऱ्यांचा विरोध आहे.
  • जमिनीचे दर जाहीर न करता भूसंपादन सुरू केल्याने शेतकऱ्यांनी हरकती दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
  • पाली ग्रामसभेने टोरंट प्रकल्पासाठी जमीन न देण्याचा ठराव मंजूर केला असून शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
कर्जत: कर्जत तालुक्यात होऊ घातलेल्या टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी आवश्यक असलेला रस्ता बनवण्याची तयारी सुरू केली आहे. शासनाने रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, मात्र त्या जमिनी देण्यास आणि आता जमिनीमध्ये लावण्यात आलेली भाताची शेती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. दरम्यान शासनाने जमिनीचे भाव निश्चित केले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आणि आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे.

Raigad News: ८ महिन्यांत निवृत्ती… तरीही अचानक बदली, श्रीवर्धनमध्ये नेमकं काय घडलं? ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा

कर्जत तालुक्यात पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत हद्दीत जलविद्युत प्रकल्प टोरंट वीज कंपनी उभारत आहे. टोरेंट पॉवर कंपनी आणि शासनामार्फत सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांनी एकजुटीचा पवित्रा घेतला आहे. भालीवडी, आंबोट, पोटल, पाली आणि हुमगाव या गावांमधील जमिनी या भूसंपादनात समाविष्ट आहेत. या सर्व शेतकरी बांधवांना सर्वसामान्य असलेले शेतकरी मंगेश म्हसे यांनी आवाहन केले आहे. पाली ग्रामस्थांनी आपल्या जमिनी टोरंट प्रकल्पासाठी दिल्या जाणार नाही, अशी भूमिका घेतली असून हा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

तर या प्रकल्पाच्या मुख्य बांधाजवळ असलेल्या मोहमाळवाडी आणि आंबेवाडीमधील आदिवासी ग्रामस्थांनी देखील धरणाच्या हालचाली सुरू झाल्यापासून विरोध कायम ठेवला आहे. धरणाच्या मुख्य बांधाजवळ जाण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता बनवण्यासाठी शासनाने अधिसूचना जारी केली आहे. पाली गावातील ग्रामस्थ शिवाजी श्रीखंडे यांनी देखील आपली फसवणूक होऊ शकते आणि शासनाच्या कोणत्याही जाहिरातीला बळी पडू नका, असे आवाहन केले आहे. तसेच शासनाने आमच्या जमिनीचे दर देखील निश्चित केले नसल्याने आमची जमीन कवडीमोल दराने आम्ही कोणाच्याही घशात घालणार नाही, असा निर्धार या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.

बहुसंख्य शेतकऱ्यांकडून हरकती..

सध्या भालिवडी येथून पाली गाव आणि पुढे आंबेवाडी पर्यंत रस्ता तयार आहे. असे असताना स्वतंत्र रस्ता तयार करण्यासाठी काढण्यात आलेली अधिसूचना लक्षात घेता शेतकरी जमिनी देण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता शेतक-यांनी जमीन द्यायची नाही यासाठी हरकती नोंदवण्यास सुरुवात केली आहे.

Raigad News: स्मार्ट मीटरबाबत महावितरणचं मोठं स्पष्टीकरण; ग्राहकांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही

टोरंट कंपनीसाठी धोक्याची घंटा

शासनाने पाली तर्फे कोतवाल खलाटी येथे जाणाऱ्या रस्त्यासाठी पाच गावांमधील जमिनीचे अधिग्रहण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ५.९१ किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यासाठी पाच गावातील ३९० शेतक-यांच्या काही हेक्टर जमिनीवर बुलडोझर फिरवून रस्ता तयार केला जाणार आहे. जमिनीमध्ये आता भाताच्या पिकाची लागवड केली जात आहे. त्याचवेळी उन्हाळ्यात देखील रस्ता तयार केल्या जाणाऱ्या भागात भाताची शेती केली जाते, हे लक्षात घेता शेतकऱ्याऱ्यांनी तुटपुंज्या रकमेसाठी आपली जमीन देण्यापेक्षा आयुष्यभर शेती करून जमीनदार म्हणून राहू, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शासनाने अधिसूचना काढल्यानंतर शेतकऱ्यांनी घेतलेली प्रकल्प विरोधी भूमिका टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Karjat torrent power project faces farmer opposition over land acquisition raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Karjat
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Chandrapur News: ताडोबातील पारंपरिक रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त; पारंपरिक रस्ता सुरू करण्यासाठी वन विभागाविरोधात आंदोलन
1

Chandrapur News: ताडोबातील पारंपरिक रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त; पारंपरिक रस्ता सुरू करण्यासाठी वन विभागाविरोधात आंदोलन

Raigad News: पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; उद्योगांच्या सांडपाण्याची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी
2

Raigad News: पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; उद्योगांच्या सांडपाण्याची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी

Maharashtra Drought: दिवाळीआधीच हजारो घरांना टाळं! दुष्काळामुळे शेतमजुरांवर स्थलांतराची वेळ
3

Maharashtra Drought: दिवाळीआधीच हजारो घरांना टाळं! दुष्काळामुळे शेतमजुरांवर स्थलांतराची वेळ

Raigad News: जनतेचा विरोध असेल तर बल्क ड्रग पार्क नकोच; सुनील तटकरेंची स्पष्ट भूमिका
4

Raigad News: जनतेचा विरोध असेल तर बल्क ड्रग पार्क नकोच; सुनील तटकरेंची स्पष्ट भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.