Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस
पालकमंत्रीपदाची नवी जबाबदारी मिळाल्यानंतर महाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवाला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पारंपरिक उत्सवाला आधुनिक आयोजनाची जोड देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी आयोजकांनी यंदा भरघोस पारितोषिकांची घोषणा केली आहे. त्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
मंडळाचे अध्यक्ष राजू पावले यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या गोविंदा पथकाला तब्बल १ लाख ५१ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. आठ थर रचणाऱ्या पथकासाठी १ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. याशिवाय पुरुष गोविंदा पथकांसाठी सात थरांना २५ हजार, सहा थरांना १२ हजार आणि पाच थरांना ७हजार रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. महिला गोविंदा पथकांसाठीही विशेष पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे. पाच थर रचणाऱ्या महिला पथकाला १२ हजार, तर चार धरांसाठी ७ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.
राज्यातील 11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रवींद्र खेबुडकर यांची सिंधुदुर्गातून पुण्यात बदली
दहीहंडी उत्सवाचे यूट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून, गोविंदा पथकांची आणि उपस्थितांची सुरक्षितता लक्षात घेऊन विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. सुरक्षिततेची जबाबदारी सिस्केप संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान, सायंकाळी ७ वाजल्यानंतर कोणत्याही गोविंदा पथकाचा प्रवेश स्वीकारला जाणार नाही, असे आयोजकांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाचा मानाचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असल्याने सहभागाची उत्सुकता वाढली आहे. रायगड जिल्ह्यातील विविध गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.






