Photo Credit- Social Media
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया संपेल. त्यानंतर राज्यभरात कुठे, किती टक्के मतदान झाले, जनतेचा प्रतिसाद का होता. याचे एक्झिट पोलचे निकाल जाहीर होतील. राज्यातील गेल्या पाच वर्षांतील राजकीय घडामोडी पाहता यंदा महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरशीची लढत होत आहे. त्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक क्षणाचा कल जाणून घेण्यासाठी जनतेत मोठी उत्सुकता दिसून येत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेत निवडणुकीचे एक्झिट पोलचे निकाल लोकांना कुठे पाहायला मिळणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा महायुतीकडून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट यांच्यात निकराची लढाई होत आहे. भाजपला सत्तेतून बेदखल करण्यासाठी महाविकास आघाडीने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केल्याचे दिसत आहे. तर महाआघाडीच्या बाजूने वातावरण निर्माण होऊ न देण्यासाठी भाजपनेही आपली ताकद पणाला लावली आहे. प्रयत्न होता.
मतदारांचा कौल कुणाला? Exit Poll चे अंदाज लवकरच, ओपिनियन पोलपेक्षा किती वेगळे? जाणून घ्या एका क्लिकवर
राज्यातील 288 जागांवर एकूण 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात 3771 पुरुष, 363 महिला आणि तृतीयपंथी 2 उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर लगेचच संध्याकाळी 6.30 च्या सुमारास एक्झिट पोलचे निकाल येण्यास सुरुवात होईल.
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने महाराष्ट्रात 161 जागा जिंकल्या होत्या. यात भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 44 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या. याशिवाय इतरांना 29 जागा मिळाल्या होत्या. यातही छोट्या पक्षांना 16 जागा मिळाल्या. तर 13 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. पण मुख्यमंत्रीपदावरून मतभेद झाल्याने ऐन सत्तास्थापनेच्या वेळी भाजप-शिवसेनेची युती तुटली. भाजपकडे बहूमत नसल्याने शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जात सरकार स्थापन केले.
पण यावेळीची परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्य मोठी फूट पडली. त्यामुळे यावेळी महाराष्ट्रात सहा मोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले हेत. यावेळी महाविकास आघाडीकडून सर्वाधिक 101 जागांवर काँग्रेस आणि महायुतीकडून भाजप 149 जागांवर निवडणूक लढवत आहे.