Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : माथेरानच्या वीज समस्येवर मनसे आक्रमक; उपोषणानंतर महावितरणकडून आश्वासन

माथेरान शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येविरोधात मनसेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले. मनसे शहराध्यक्ष संतोष कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला. वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक आणि पर्यटन व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 11, 2026 | 02:06 PM
माथेरानच्या वीज समस्येवर मनसे आक्रमक; उपोषणानंतर महावितरणकडून आश्वासन

माथेरानच्या वीज समस्येवर मनसे आक्रमक; उपोषणानंतर महावितरणकडून आश्वासन

Follow Us
Follow Us:
  • माथेरानच्या वीज समस्येवर मनसे आक्रमक
  • वारंवार वीज खंडित होत असल्याने माथेरानमध्ये मनसेचे आमरण उपोषण स्थगित
  • माथेरानच्या वीज प्रश्नावर सर्वपक्षीय एकवटले
माथेरान : माथेरान शहरातील विजेच्या समस्या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने उपोषण करण्यात आले.शहर अध्यक्ष संतोष कदम यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाला माथेरान मधील सर्व पक्षीय यांनी पाठिंबा दिला होता.महावितरणचे उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी माथेरान मधील सर्व कामे मंजूर असल्याचे पत्र सादर केल्य नंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान मधील वीज पुरवठा खंडित होत आहे.गेले अनेक महिने वीज पुरवठा समस्या कायम आहे.माथेरान साठी कळंबोली आणि नेरळ किंवा कर्जत इतर ठिकाणाहून वीज पुरवली जाते. त्यामुळे दुर्गम भागात असलेल्या माथेरान फिडर आणि डिओ सारखे बंद पडत असतात. माथेरान मध्ये अनेक वर्ष सुरू असलेला वीज पुरवठा खंडित होण्याचा हा परिणाम आहे.वीज नसताना देखील माथेरान कर वीज बिल भरण्याचे काम करतात. जर तुम्ही माथेरानची जबाबदारी घेत नसाल तर तुमचे माथेरानमध्ये काम काय ? असा प्रश्न मनसेचे शहर अध्यक्ष संतोष कदम यांनी उपस्थित केला आहे.महावितरण कंपनी कडून माथेरानचे कडे गांभीर्य पूर्वक लक्ष देत नाहीत.शासन दरबारी विषय मांडून देखील माथेरान बाबत महावितरण सकारात्मक नाही.

Matheran News : रेल्वे स्थानकात बेकायदा जाहिरातींचा विळखा; संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

वीज खंडित होण्याचे प्रश्न मार्गी लावले जात नसल्याने मनसे आक्रमक झाली आहे. वीज खंडीत होत असल्याने कित्तेक विजेवर चालणारे उपकरणे बंद पडत आहेत याची जबाबदारी कोण घेणार तुम्ही भरून देणार आहात का?कारण जर आम आदमी तुमचे प्रामाणिक ग्राहक आहोत तर तुमची जबाबदारी आहे?पण महावितरण कडून कोणतीही जबाबदारी स्वीकारली जात नाही.

वीज पुरवठा बाबत माथेरान मधील वीज ग्राहकांची सहनशक्ती संपली आहे असा इशारा मनसेचे माथेरान शहर अध्यक्ष संतोष कदम असा इशारा देत उपोषणाला सुरुवात केली होती.माथेरान शहरातील श्रीराम चौकात आयोजित उपोषणाला माथेरान शहरातील शिवसेना शिंदे गट,शिवसेना ठाकरे गट,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,भाजप,आरपीआय,यांनी तसेच शहरातील सर्व जाती धर्माचे प्रमुख यांनी उपोषण स्थळी येऊन पाठिंबा दिला.दुपारी महावितरणचे कर्जत येथील उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी उपोषन स्थळी येऊन सर्व समस्या जाणून घेतल्या.त्यानंतर महावितरण कडून माथेरान मध्ये करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि प्रकल्प यांची लेखी माहिती दिल्यानंतर मनसेचे शहर अध्यक्ष संतोष कदम यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते ज्यूस पिऊन संतोष कदम यांनी उपोषण स्थगित केले.तर महावितरण कडून लेखी निवेदन देण्यात आले असून मनसेचे कर्जत तालुका अध्यक्ष यशवंत भवारे यांनी आमच्या शहर अध्यक्षांना चौथ्यांदा उपोषण करण्याला महावितरण ने भाग पाडू नये अशी तंबी महावितरण कंपनीला दिली.यावेळी माथेरान चे उपनगराध्यक्ष संतोष शेलार तसेच सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख उपस्थित होते.

Matheran News: पर्यटकांच्या सोयीसाठी दस्तुरी प्रवेशद्वार मोकळे; अनधिकृत टपऱ्यांवर नगरपरिषदेचा हातोडा

Web Title: Matheran electricity issue mns hunger strike mahavitaran assurance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • electricity
  • Matheran
  • MNS

संबंधित बातम्या

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
1

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
2

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा
3

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा

Raju Patil: वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल द्या! ‘जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा नको’; वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट
4

Raju Patil: वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल द्या! ‘जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा नको’; वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.